तानाजी मालुसरेंनी जिंलेल्या कोंढाण्याची ही गोष्टी सगळ्यांनी वाचावीच

यिनबझ टीम
Thursday, 21 November 2019

नुकताच अजय देवगन ajay devgan आणि सैफ अली खान saif ali khan यांचा 'तानाजी' चा taanaji the unsung warrior  ट्रेलर रिलीज झाला आहे. या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्याच्या शूर सेनानी तानाजी मालुसरे यांनी कोंढाणा किल्ला जिंकण्यासाठी आपला जीव दिला, हा किल्ला त्यांच्या मृत्यूनंतर सिंहगड किल्ला म्हणून ओळखला जाऊ लागला. हा किल्ला महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात आहे.

नुकताच अजय देवगन ajay devgan आणि सैफ अली खान saif ali khan यांचा 'तानाजी' चा taanaji the unsung warrior  ट्रेलर रिलीज झाला आहे. या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्याच्या शूर सेनानी तानाजी मालुसरे यांनी कोंढाणा किल्ला जिंकण्यासाठी आपला जीव दिला, हा किल्ला त्यांच्या मृत्यूनंतर सिंहगड किल्ला म्हणून ओळखला जाऊ लागला. हा किल्ला महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात आहे.

कोंढाणा किल्ला खूप जुना आहे. शिवाजी महाराजांपूर्वीही अनेक राजांनी या किल्ल्यावर राज्य केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात हा किल्ला त्यांच्या ताब्यात होता. हा किल्ला आदिलशहा जवळ होता तेव्हा दादोजी कोंडदेव या किल्ल्याचे राज्यपाल होते. याच ठिकाणी आदिलशहाने आपली छावणी बांधली होती.

नंतर शिवाजी महाराजांनी ती छावणी आपल्या ताब्यात घेतली. सन 1649 मध्ये, शिवाजी महाराजांनी आपले वडील शाहू महारांजना आदिलशहाच्या तावडीतून सोडवण्यासाठी हा किल्ला आदिलशहाला परत केला. त्यानंतर संघर्ष करून तो किल्ला पुन्हा शिवाजी महाराजांनी परत जिंकला. महाराजांनी जून 1665 मोगलांशी करार करत कोंढाण्यासह २२ किल्ले त्यांना परत केले. या करारामुळे शिवाजी महाराज फारच दु: खी झाले होते. मराठा सैन्यासाठी महत्त्वाचा असलेला हा किल्ला परत घेण्याचा त्यांनी निर्णय घेतला.

शिवाजी महाराजांच्या सैन्यात अनेक सरदार होते. ते कोंढाणा किल्ला जिंकण्यास सज्ज होते, पण या अशक्य कार्यासाठी शिवाजी महाराजांनी तानाजी मालुसरे यांची निवड केली, जे शिवाजी महाराजांचे बालपणीचे मित्र आणि त्यांचे खास सरदार होते. त्यांनी शिवाजी महाराजांसोबत अनेक लढाया जिंकल्या होत्या.

कोंढाणा किल्ल्याच्या युद्धाची तयारी सुरू असताना तानाजीचा मुलगा रायबाचेही लग्न होणार होते. शिवाजी महाराजांचे सरदार शेलार मामा यांनी रायबाशी लग्न झाल्यावर कोंढाणा किल्ल्याच्या मोहिमेवर जाण्याचा सल्ला तानाजी मालुसरे यांना दिला होता, पण तानाजींनी शेलार मामाचे न ऐकता कोंढाणा किल्ल्याच्या मोहिमेवर गेले.

4 फेब्रुवारी 1672 रोजी तानाजी मालुसरे यांनी आपल्या सैन्यासह कोंढाणा किल्ल्यावर हल्ला केला. मराठ्यांनी मोगलांचा पराभव करून हा किल्ला जिंकला, पण त्यात तानाजी मालुसरे शहीद झाले. ज्यावेळेला ही बातमी शिवाजी महाराजांना समजते, त्यावेळेला त्यांच्या तोंडून गड आला पण सिंह गेला हे उद्गार निघतात.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News