या 'नांदेड पॅटर्न'ची नांदेडकरांना लाज वाटतेय; भ्रष्टाचार करणाऱ्यांनी कोणतेच क्षेत्र शिल्लक ठेवले नाही

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 5 June 2019

नांदेड : एकेकाळी नांदेड जिल्हा विविध शासकीय उपक्रमात अव्वल राहून उपक्रमशील जिल्हा म्हणून राज्यात ओळखला जात होता. गेल्या काही वर्षांपासून सरकारी कामकाजात घोटाळा झाला की राज्यात नांदेडचे नाव आघाडीवर येत आहे. नांदेडमध्ये गेल्या काही दिवसांत नोकर भरती घोटाळा, धान्य घोटाळा, पोलीस भरती घोटाळा उघडकीस आला होता. आता ऐन दुष्काळात पाण्याच्या टँकरमध्येही घोटाळा करण्याच पाप नांदेडमध्ये घडताना दिसत आहे. त्यामुळे घोटाळ्याचा हा नांदेड पॅटर्न सर्वांनाच लाज वाटण्यासारखा ठरतोय.

नांदेड : एकेकाळी नांदेड जिल्हा विविध शासकीय उपक्रमात अव्वल राहून उपक्रमशील जिल्हा म्हणून राज्यात ओळखला जात होता. काही वर्षांपासून सरकारी कामकाजात घोटाळा झाला की राज्यात नांदेडचे नाव आघाडीवर येत आहे. नांदेडमध्ये गेल्या काही दिवसांत नोकर भरती घोटाळा, धान्य घोटाळा, पोलीस भरती घोटाळा उघडकीस आला होता. आता ऐन दुष्काळात पाण्याच्या टँकरमध्येही घोटाळा करण्याच पाप नांदेडमध्ये घडताना दिसत आहे. त्यामुळे घोटाळ्याचा हा नांदेड पॅटर्न सर्वांनाच लाज वाटण्यासारखा ठरतोय.

जिल्ह्यात सध्या भीषण पाणीटंचाई आहे. विशेषतः मुखेड तालुक्यात सर्वात वाईट परिस्थिती आहे. मात्र तालुक्यात कागदोपत्री टँकर सुरु असल्याचे दाखवत बिल उचलून घेत असल्याचा आरोप मुखेडचे  आमदार तुषार राठोड यांनी केला आहे.

जिल्ह्यातील टंचाईचा आढावा घेण्यासाठी नूतन खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी प्रशासनाची आढावा बैठक घेतली असता, त्यात या घोटाळ्याची वाच्यता झाली आहे. जिल्ह्यात सध्या १३३ टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. त्यापैकी एकट्या मुखेड तालुक्यात ६० टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. मात्र मुखेडचे आमदार तुषार राठोड यांनी ४ जून रोजीची ताजी आकडेवारी या बैठकीत उघड केली. मुखेड तालुक्याला ४ जून रोजी ५९ फेऱ्या मंजूर आहेत, मात्र त्यापैकी ४० टँकरच्या फेऱ्या गावात पोहोचलेच नाही असा आरोप आमदार राठोड यांनी केला आहे.

या सगळ्या प्रकारावर खासदार प्रताप पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत चार दिवसात काय ते तथ्य शोधून टँकरच्या ठेकेदारावर फौजदारी कारवाई करा, अशी सूचना बैठकीत केली. एकीकडे पाण्यासाठी टाहो फोडणारे सर्वसामान्य आणि त्याच पाण्यावर आपले उखळ पांढरे करून घेणाऱ्याचा शोध लागलाच पाहिजे असा सूर पाणी टंचाईच्या या आढावा बैठकीत निघाला. भ्रष्टाचार करणाऱ्यांनी आता कोणतेच क्षेत्र शिल्लक ठेवले नसल्याचे या प्रकारावरून उघड होतय. टँकर घोटाळ्यात पुढे काय होत त्याकडे जिल्ह्याच लक्ष लागलं आहे.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News