अस्थमाने देशात दरवर्षी दीड कोटी मृत्यू, तरूणांचं प्रमाण अधीक, करा असे उपाय

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 9 May 2019
  • अस्थमा रुग्णांनी पूर्ण उपचार करून घेणे आणि औषधोपचार मध्येच न थांबविण्याचा सल्ला आरोग्य विभागातर्फे देण्यात आला आहे.
  • दरवर्षी मे महिन्यातील पहिल्या मंगळवारी जागतिक अस्थमा जगजागृती दिन साजरा केला जातो. 
  • देशात ४ ते ५ कोटी अस्थमा किंवा दम्याचे रुग्ण असल्याची नोंद आहे.

अकोला -  अस्थमा किंवा दम्याच्या रुग्णांकडून उपचाराबाबत निष्काळजीपणा केला जात असल्याने दरवर्षी दीड कोटीपेक्षा अधिक रुग्णांना मृत्यूचा सामना करावा लागत आहे. जागतिक आरोग्य संघटना आणि आरोग्य विभागाच्या पाहणीत ही बाब पुढे आली आहे. त्यामुळे अस्थमा रुग्णांनी पूर्ण उपचार करून घेणे आणि औषधोपचार मध्येच न थांबविण्याचा सल्ला आरोग्य विभागातर्फे देण्यात आला आहे. दरवर्षी मे महिन्यातील पहिल्या मंगळवारी जागतिक अस्थमा जगजागृती दिन साजरा केला जातो. 

जागतिक आरोग्य संघटनेने (डब्लूएचओ) केलेल्या सर्वेक्षणात जगभरात एकूण २० दशलक्ष रुग्ण आढळून आलेत. त्यातील १२ टक्के रुग्ण हे एकट्या भारतात आहेत. देशात ४ ते ५ कोटी अस्थमा किंवा दम्याचे रुग्ण असल्याची नोंद आहे. देशपातळीवर रुग्णांची संख्या नोंदविली जात असली, तरी स्थानिक पातळीवर या रुग्णांबाबत आरोग्य विभागाकडे कोणतीही माहिती नाही. त्यामुळे दरवर्षी ७० टक्के रुग्ण मध्येच उपचार थांबवितात. त्यामुळे अस्थमा अटॅकचा धोका वाढून दरवर्षी एकूण रुग्णांपैकी ४२ टक्के रुग्णांना मृत्यूचा सामना करावा लागत असल्याचे आरोग्य विभागातर्फे सांगण्यात आले.

देशात दरवर्षी पाच टक्के अस्थमा रुग्णांची वाढ होत आहे. या आजाराबाबत असलेले समज-गैरसमज, यामुळे ७० टक्के रुग्ण मध्येच उपचार थांबवितात. त्यामुळे अस्थमा अटॅकचा धोका वाढतो. दरवर्षी ४२ टक्के रुग्णांचा मृत्यू केवळ या कारणामुळे होतो. नियमित व योग्य उपचारामुळे अस्थमा नियंत्रणात ठेवता येऊ शकतो. त्याकडे दुर्लक्ष करणे धोकादायक आहे. 
- डॉ. आशिष सालकर, दमा व क्षयरोगतज्ज्ञ
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News