आमच्यात लग्नाआधी सेक्स झाला तरीही ब्रेकअप...

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 5 September 2019

प्रेम म्हणजे फक्त शरिराचं आकर्षण नसुन ते एकमेकांना समजून घेणे, एकमेकांचा विश्वास संपादन करणे, एकमेकांच्या गोष्टी समजून घेणे अशा अनेक गोष्टी त्यात होत असतात. maturity नावाचा प्रकार यात खूप महत्वाचा असतो. ज्यावेळेला तो दिसून येत नाही किंवा दोघांमध्ये समजूतदारपणा नसले तर ते रिलेशन जास्त वेळ टिकत नाही, असाच प्रकार आमच्या दोघांमध्ये घडला.

काही महिन्यांपूर्वी आम्ही रिलेशनशिपमध्ये अडकलो. त्याआधी आमच्या दोघांमध्ये कोणतीच ओळक नव्हती. आम्ही अनोळख्या पध्दतीने थेट प्रेमसंबंधात अडकलो, त्यामुळे एकमेकांना रिलेशनशिपच्या आधी एकमेकांना समजून घेता नाही आलं.

रिलेशनशिपचे काही दिवस आमच्यात खूप छान conversation आणि इतर गोष्टी सुरळीत सुरू होत्या, मात्र काही दिवसानंतर गैरसमज आणि दोघांमधला कमी होत असलेलं संभाषण यामुळे त्यांच्यात वाद सुरू झाले. या वादांमुळे त्यांचे रिलेशन एक-दोन वेळा तुटलेदेखील होते. त्यात तिने केलेल्या विनंतीमुळे त्यांच्यात पुन्हा एकोपा निर्माण झाला मात्र तो एकोपा जास्त दिवस टिकणारा नव्हता, हेही तितकेच खरे होते. 

त्यांच्या सुरळीत सुरू असलेल्या रिलेशनशीपमध्ये काहीवेळा त्यांच्यात शरिरसंबंधही झाले होते. त्या दोघांना त्यांच्या नात्यावर अतूट विश्वास होता. लग्नानंतरच्या काही गोष्टीदेखील त्यांच्यात होत असत, मात्र अखेर त्यांच्या दोघांमध्ये कमी झालेलं संभाषण हेच त्यांच्या ब्रेकअपचं कारण ठरलं.

मुंबईतल्या बड्या कंपनीमध्ये काम करणाऱ्या सतीशने ही व्यथा मांडली आहे. तो आणि त्याची एक्स गर्लफ्रेंड गेल्या सहा महिन्यांपासून रिलेशशिपमध्ये होते. दोघांच्यांही कामाची सुरूवात एकाच ठिकाणाहून झाली; मात्र त्यांच्यात नंतर होणारा दुरावा हेच त्यांच्या दोघांचे नाते तुटण्याचे कारण बनले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News