फोन चोरीला गेला तरी टेन्शन नॉट, असं करा वॉट्स अॅप बंद

यिनबझ टीम
Tuesday, 25 February 2020

आता फोन चोरीला जाणे म्हणजे सर्वसाधारण गोष्ट झालीये. तेव्हा फोन चोरी झाल्यास व्हाट्सएप अकाऊंट सुरक्षित करणे खूप महत्वाचे आहे. त्यामुळे तुम्हाला आता अशा काही खास टिप्स सांगणार आहोत, जेणेकरून तुमचा फोन हरवला तरी तुमची सिक्रेट चाट्स कोणी पाहू शकणार नाही.

व्हॉट्सअ‍ॅप जगभरात 200 दशलक्षाहूनही अधिक लोक वापरत आहेत. हे अॅप युजर्ससाठी व्हॉईस-व्हिडिओ कॉलिंगसह चॅट आणि फोटो-व्हिडिओदेखील इतरत्र शेअर करण्यासाठी वापरले जाते. अशातच तुमचा फोन चोरीला गेला तर?

जर तुमचा फोन चोरीला गेला, तर सगळ्यात आधी तुम्ही तुमच्या मोबाईल नेटवर्क प्रोव्हाइडरला (198 या नंबरला) कॉल करून सीम ब्लॉक करून घ्या.

तुम्ही ज्यावेळी नवीन फोन घ्याल, त्यावेळी त्यात तुम्हाला सिम गॅलरीमध्ये जाऊन तुमच्या जुन्या नंबरचे नवीन सिमकार्ड मिळेल, ते घेऊन तुम्हाला फोन सुरू करायचा आहे. सोबबतच तुम्हाला त्या फोनमध्ये व्हॉट्स अॅप सुरू करायाचे आहे. एक व्हॉट्स अॅपचे एक अकांऊट एकाच फोनमध्ये सुरू होते, हे तुमच्या लक्षात असू द्या, त्यामुळे तुम्ही या फोनमध्ये सुरू केलेल्या व्हॉट्स अॅपमुळे तुमच्या हरवलेल्या फोनमधील व्हॉट्स अॅप आपोआप बंद होईल.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News