#युरोपायण (रोटरडँम-अँमस्टरडँम-कोलोन)

प्रकाश तांबे
Sunday, 18 August 2019
  • हॉलंडची छोटी प्रतिकृती पहाण्यापूर्वी अत्यंत सुरेख चित्रित केलेली प्रतिकृतीविषयीची पार्श्वभूमी समजाउन देणारी अॉडियो व्हीडीयो फिल्म मोठ्या पडद्यावर दाखवली जाते.
  • राजधानी अँमस्टरडँमच्या 1 तासाच्या सीटी टूरसाठी बोटीतून जायला क्यूमधे थांबलो.
  • कोलोनच्या हॉटेलमधे मुक्काम करण्यापूर्वी सुमारे साडेपाचशे फूट उंचीच गॉथिक रचनेतील सातशे वर्ष जुन्या कॅथलिक चर्चपाशी फोटो स्टॉप घेतला.

 

कालचा दिवस संस्मरणीय! म्हणजे पहा न, फ्रांसमधे पँरीसला ब्रेकफास्ट, बेल्जीयममधे ब्रुसेल्सला लंच आणि हॉलंडमधे रोटरडँमला डिनर!

रोटरडँम-
रोटरडँम, म्हणजेच हॉलंड किंवा नेदरलँडमधील, डच लोकांच्या शहरात येता येताच नदी, त्यावरील ब्रिज आणि बाहेरुन विशिष्ट बारीक बारीक टायलींग असलेल्या 8-10 मजली इमारती पाहून खूप छान वाटल; लंडन, पँरीस, ब्रुसेल्सहून डचांच वेगळेपण नक्कीच जाणवल. बहुतेक घरांना बाल्कनी किंवा टेरेस होत्या. रस्तेही भव्य आहेत. ब्रेकफास्ट आवरुन हॉलंडच मिनी व्हर्शन, मदूरोडँम, बघायला जायच ठरल.

संपूर्ण हॉलंडची छोटी प्रतिकृती पहाण्यापूर्वी अत्यंत सुरेख चित्रित केलेली प्रतिकृतीविषयीची पार्श्वभूमी समजाउन देणारी अॉडियो व्हीडीयो फिल्म मोठ्या पडद्यावर दाखवली जाते. त्या नंतर 15-20 एकरात तयार केलेली संपूर्ण हॉलंडची कलात्मकरीत्या तयार केलेली प्रतिकृती बघायला प्रवेश मिळतो. फार छान संकल्पना आहे!

अँमस्टरडँम-
मदूरोडँमहून एखाद तासात लंचसाठी पोहोचलो आणि अंदाजे दीडच्या सुमारास नेदरलँडची राजधानी अँमस्टरडँमच्या 1 तासाच्या सीटी टूरसाठी बोटीतून जायला क्यूमधे थांबलो. प्रत्येक प्रवाशासाठी हिंदी वा इंग्रजीमधे कॉमेंटरीची व्यवस्था होती. कँनाल भोवतीच्या इमारतींचा इतिहास व घडलेले बदल तसेच अँमस्टरडँम शहराचा थोडक्यात पण महत्वाचा इतिहास सांगितला जात होता. शिवाय बोटीचा कँप्टनही माईकवर महत्वाच्या बाबी सांगत होता. हॉलंड हा देशच समुद्र हटवुन वसवलेला देश आहे. समुद्राच आक्रमण थोपवुन अँमस्टरडँमचा बीझी एअरपोर्ट (Schevningen) तर समुद्रसपाटीहुनही खाली तयार केला आहे. एकूणच बोटीतून घडलेली सीटी टूर नक्किच उपयुक्त आणि स्मरणात रहाणारी होती.

कोलोन-
अँमस्टरडँमहून जर्मनीची बॉर्डर क्रॉसकरुन कोलोनला निघालो आणि कोलोनच्या हॉटेलमधे मुक्काम करण्यापूर्वी सुमारे साडेपाचशे फूट उंचीच गॉथिक रचनेतील सातशे वर्ष जुन्या कॅथलिक चर्चपाशी फोटो स्टॉप घेतला. या चर्चचे बांधकाम कित्येक वर्ष चालु होतं आणि हे चर्च पूर्णपणे कधीच बांधून होणार नाही असे अशी आख्यायिका टूर मँनेजरकडून ऐकायला मिळाली.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News