विद्यार्थ्यांच्या परीक्षेसंदर्भात तक्रार निवारण कक्षाची स्थापना

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 12 May 2020
  • परीक्षेसंदर्भातील विद्यार्थ्याच्या अडचणी सुटण्यास सुलभता

अमरावती : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या परीक्षा विभागाच्यावतीने उच्च शिक्षण संचालक यांचेकडून प्राप्त झालेल्या पत्राच्या अनुषंगाने आणि कोव्हीड-19 च्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत महाविद्यालये तथा विद्यार्थ्यांना परीक्षा व त्यांच्या शैक्षणिक कार्याकरीता मार्गदर्शन मिळावे, यासाठी परीक्षा विभागांतर्गत विद्यार्थी तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या कक्षाच्या स्थापनेमुळे परीक्षेसंदर्भातील अडचणी उद्भवल्यास विद्यार्थ्यांना व महाविद्यालयांना संबंधित अधिकायांशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधता येणार आहे.

परीक्षा आवेदनपत्रे, प्रवेश पत्रे, परीक्षा क्रमांक, शुल्क, गुणपत्रिका पडताळणी, उन्हाळी 2020 संदर्भातील सर्व माहिती, याशिवाय प्रश्नपत्रिकाशी संबंधित त्रुटी व समस्या, गैरमार्ग प्रकरण, लेखी व प्रात्याक्षिक परीक्षा, पुनर्मूल्यांकनासंबंधी माहिती तसेच ऑनलाईन परीक्षेसंदर्भातील माहिती,नामांकन, प्रवजन प्रमाणपत्र, समकक्षता प्रमाणपत्र, पदवी प्रमाणपत्रे, दुय्यम गुणपत्रिका, गुणवत्ता प्रमाणपत्र, उत्तीर्ण प्रमाणपत्र, प्रयत्न प्रमाणपत्र, पदवी प्रमाणपत्र पडताळणी, आचार्य पदवी संदर्भातील माहिती, ट्रान्सक्रीप्ट सर्टिफिकेट, वेळापत्रके व जुन्या व नवीन अभ्यासक्रमांसंबंधी माहिती आदींबाबत विद्यार्थ्यांना व महाविद्यालयांना काही अडचणी असल्यास ते परीक्षा विभागातील संबंधित अधिकायांशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून आपल्या तक्रारीचे वा समस्यांचे निवारण करुन घेतील.  

संबंधित अधिकायांची नावे वा त्यांचे भ्रमणध्वनी क्रमांक विद्यापीठाच्या www.sgbau.ac.in या संकेतस्थळावर देण्यात आलेले आहे.  काही तांत्रिक कारणांमुळे संबंधित अधिकायांशी संपर्क होवू न शकल्यास परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक यांचेशी 9764996787 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधता येईल. तरी सर्व संबंधित विद्यार्थी, पालक, अभ्यागत, महाविद्यालये यांनी परीक्षेसंदर्भात कुठलीही अडचण असल्यास विद्यार्थी तक्रार निवारण कक्षांतर्गत दिलेल्या अधिकायांशी संपर्क साधावा व आपल्या तक्रारीचे वा समस्यांचे निवारण करुन घ्यावे, असे आवाहन परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. हेमंत देशमुख यांनी केले आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News