होमगार्ड प्रश्‍नाबाबत ३ सदस्यीय समिती स्थापन करा

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 15 August 2020
  • होमगार्डस्‌च्या समस्यांचा अभ्यास तसेच त्या सोडवण्यासाठी तीन सदस्यीय समिती स्थापन करण्याचे निर्देश केंद्रीय गृहमंत्रालयांतर्गत येणाऱ्या केंद्रीय महासंचालकांनी राज्याच्या होमगार्ड विभागाला दिले आहेत.

मुंबई :- होमगार्डस्‌च्या समस्यांचा अभ्यास तसेच त्या सोडवण्यासाठी तीन सदस्यीय समिती स्थापन करण्याचे निर्देश केंद्रीय गृहमंत्रालयांतर्गत येणाऱ्या केंद्रीय महासंचालकांनी राज्याच्या होमगार्ड विभागाला दिले आहेत. तसेच केलेल्या कारवाईचा आहवाल सादर करण्यासदेखील सांगितले आहे.

बसव प्रतिष्ठानने पत्राद्वारे राज्यातील होमगार्डच्या समस्या केंद्रीय गृहमंत्रालयाला कळवल्या होत्या. राज्यात गरज असूनदेखील होमगार्डना काम मिळत नाही. सरकारने पैशांची तरतूद केलेली असतानादेखील होमगार्डना पूर्ण भत्ते किंवा वेतन दिले जात नाही, अशा तक्रारी या पत्रात करण्यात आल्या होत्या. अनेकदा तक्रार करूनदेखील त्याची दखल घेतली जात नसल्याचे सांगत याप्रकरणी गंभीर दखल घेऊन कारवाई करण्याची मागणी बसव प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष रामलिंग पुराणे यांनी केली होती.

"केंद्रीय गृहमंत्रालयाने आमच्या मागण्यांची दखल घेतली असून आता तरी आमच्यावरील अन्याय दूर होईल आणि आम्हाला न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे, असे बसव प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष रामलिंग पुराणे यांनी सांगितले.
 

 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News