म्हणून जगभरात 'जागतिक पर्यावरण दिन' साजरा करतात 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 5 June 2019

पर्यावरणाची गुणवत्ता वाढवणं, समस्या, संवर्धनाविषयी जागरूकता निर्माण करणे, पर्यावरणासाठी पुरक निर्णय घेण्याची क्षमता लोकांमध्ये निर्माण व्हावी म्हणून पोषक वातावरणाची निर्मिती करण्यासाठी पर्यावरण दिन साजरा केला जातो. दरवर्षी ५ जून हा दिवस ‘जागतिक पर्यावरण दिन’ म्हणून जगभरात साजरा करण्यात येतो. 

१९८७ पासून पर्यावरणाच्या संवर्धनात अधिकाअधिक देशांनी सहभागी व्हावं यासाठी दरवर्षी एकएक संकल्पना ठरवून वेगवेगळ्या देशाकडे जागतिक पर्यावरण दिनाचे यजमानपद देण्यात येतं. २०१८ च्या जागतिक पर्यावरण दिनाचं यजमानपद भारताकडे होतं तर यंदाचे यजमानपद चीनकडे आहे. वायू प्रदूषणावर आळा घालणं ही यंदाच्या पर्यावरण दिनाची संकल्पना आहे.

पर्यावरण दिनाची सुरूवात 
५ जून १९७२ या दिवशी स्टॉकहोम येथे बदलत्या वातावरणाची दखल घेत काही देशांची मंडळी एकत्र जमली. बदलते हवामान आणि पर्यावरण याची दखल घेण्यासाठी ही परिषद आयोजीत करण्यात आली होती. त्यानंतर दोन वर्षांनी म्हणजे १९७४ पासून ‘जागतिक पर्यावरण दिन’ साजरा करण्यात येऊ लागला.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News