बार्टी- एमसीईडी तर्फे उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 4 March 2020

अनुसूचित जातीच्या नागरिकांसाठी विनामूल्य प्रशिक्षण कार्यक्रम

नवी मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र रायगड यांच्या संयुक्त विद्यामाने अनुसूचित जातीच्या नागरिकांसाठी उद्योजगक विकास प्रशिक्षण कार्यशाळा आयोजिक करण्यात आली. खारघर येथील सत्याग्रह महाविद्यालयाच्या सभागृहात कार्यशाळा सुरु आहे. कार्यशाळेत नागरिकांनी उत्स्फुर्त सहभाग नोंदवला.

22 फेब्रुवारी ते 23 मार्च एक महिना उद्योजगक कौशल्य प्रशिक्षण कार्यशाळा चालणार आहे. कार्यशाळेत विविध क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळी मार्गदर्शन करत आहेत. प्रशिक्षकांना दरम्यान उद्योजकांना लागणारे कौशल्य कार्य शाळेत शिकविले जात आहेत. उद्योगाची निवड कशी करावी? बाजार पेठ पाहणी, सव्हेक्षण अहवाल, कर्ज योजना, प्रत्यक्ष उद्योगांना भेटी, उद्योजकांशी चर्चा,   आवश्यक नोंदणी, विवीध परवाने, प्रकल्प अहवाल, व्यावस्थापण आदी विषयांवर सखोल मार्गदर्शन आणि प्रत्यक्षिक कार्यशाळेत सुरु आहे. एमसीईडीचे प्रकल्प अधिकारी सुबोध बायस, कार्यक्रम समन्वयक वैशाली सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यशाळा संपन्न होत आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News