श्रीकृष्ण जयंती सोबत दहीहंडीची मज्जा !

नयना वाहुळे, विलेपार्ले
Wednesday, 12 August 2020
  • श्रीकृष्ण जन्माष्टमी हा हिंदूंचा महत्वाचा सण आहे.
  • भगवान श्रीकृष्णाच्या जन्माचे समरण म्हणून श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी रात्री १२:०० वाजता नंदलाल्याला पाळण्यात घालून त्याची पूजा करून जन्माष्टमीची अंगाई गात झोका घालण्यात येतो.
  • मथुरा नगरी हे कान्हाचे जन्मस्थान आहे.

श्रीकृष्ण जन्माष्टमी हा हिंदूंचा महत्वाचा सण आहे. भगवान श्रीकृष्णाच्या जन्माचे समरण म्हणून श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी रात्री १२:०० वाजता नंदलाल्याला पाळण्यात घालून त्याची पूजा करून जन्माष्टमीची अंगाई गात झोका घालण्यात येतो. मथुरा नगरी हे कान्हाचे जन्मस्थान आहे. भगवान विष्णूचा आठवा अवतार श्रीकृष्ण होते असे आजच्या घडीला सुद्धा सांगण्यात येते. दृष्ट कंस मामाचा वध करण्यासाठी हा अवतार घेतला असून याला "कृष्णावतार" असे देखील म्हंटले जाते.

भगवान श्रीकृष्णाचे बालपण हे गोकुळात गेले. यशोदा माता आणि पिता नंद हे पालनकर्ते असून त्यांच्या छायाछत्राखाली ते घडले. लहानपणी गोकुळात श्रीकृष्णाने अनेक कृष्णलीला दाखवल्या. गोकुळात त्यावेळी कृष्ण हे गोप-गोपीकांचे लाडके होते. माखन चोर म्हणून सुद्धा त्यांना बोलले जाते. त्यामुळे दहीहंडी ही कृष्णाच्या जन्मानंतर लगेच दुसऱ्या दिवशी साजरी केली जाते.

दही हंडी हा एक असा प्रकारचा सण आहे ज्यात संघ भावना काय असते हे लक्षात येते. दोरीवर टांगलेल्या मंडक्यातील लोणी मिळवण्यासाठी एकावर-एक आठ किंवा दहा थर रचून ते मिळवणे खरचं खूप साहसी वृत्ती दाखवणारे आहे. त्यात थर रचत असताना एकमेकांना विश्वासात घेऊन केलेली थरांची उभारणी खऱ्या अर्थांने थक्क करणारी आहे. हंडीचे मडके फोडल्यानंतर गोविंदा पथकांच्या चेहऱ्यावरी आनंद आणि संघवृत्तीने अशक्य गोष्ट शक्य होऊ शकते ही दाखवणची कला नक्कीच कौतुकास्पद आहे. शेवटी एवढंच म्हणेल, गोविंदा आला रे आला...

 

महाराष्ट्र मुंबई ठाणे

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News