इंग्लंडने वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात शानदार विजयी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 21 July 2020
  • चौथ्या दिवशी अखेरच्या सत्रापासून कलाटणी देण्यास सुरुवात करणाऱ्या इंग्लंडने वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात शानदार विजय मिळवला.
  • ११३ धावांनी हा सामना जिंकून त्यांनी तीन सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली.

लंडन :-  चौथ्या दिवशी अखेरच्या सत्रापासून कलाटणी देण्यास सुरुवात करणाऱ्या इंग्लंडने वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात शानदार विजय मिळवला. ११३ धावांनी हा सामना जिंकून त्यांनी तीन सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली.

बेन स्टोक्‍सच्या ५७ चेंडूंतील ७८ धावांच्या जोरावर ३ बाद १२९ धावांवर डाव घोषित करणाऱ्या इंग्लंडने विंडीजसमोर आजच्या अखेरच्या दिवशी ८५ षटकांत ३११ धावांचे आव्हान दिले आणि त्यांचा डाव ७०.०१ षटकांत गुंडाळला.
पहिल्या सामन्यातून वगळण्यात आलेल्या ब्रॉडने तीन विकेट मिळवून विंडीजला सुरुवातीपासून हादरे दिले. शाम्‌ह ब्रुक्‍स (६२) आणि ब्लॅकवूड (५५) यांनी ३ बाद २३ वरून संघाचा डाव शतकी भागीदारी करून सावरला होता, परंतु ते दोघे बाद झाल्यावर पुन्हा विंडीजची घसरगुंडी सुरू झाली.

संक्षिप्त धावफलक :- इंग्लंड पहिला डाव :- ९ बाद ४६९ घोषित आणि दुसरा डाव :- ३ बाद १२९ घोषित. वेस्ट इंडिज पहिला डाव :- २८७  आणि दुसरा डाव :- १९८ (ब्रुक्‍स ६२, ब्लॅकवूड ५५, ब्रॉड ४२-३ व्रुक्‍स ३४-२ स्टोक्‍स ३०-२)

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News