स्पर्धेच्या पहिल्याच मालिकेत विजय मिळवून इंग्लंडने मारली बाजी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 3 August 2020
  • आयर्लंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडने 4 विकेटने विजय मिळवला आणि तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली

 लंडन : आयर्लंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडने 4 विकेटने विजय मिळवला आणि तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली; तर आयसीसीच्या विश्वकरंडक सुपरलिग स्पर्धेच्या पहिल्याच मालिकेत विजय मिळवून यजमान इंग्लंडने बाजी मारली आहे. या सामन्यात विजयासाठी दिलेले 213 धावांचे आव्हान पार करताना इंग्लंडचा यष्टिरक्षक जॉनी बेअरस्टोने धडाकेबाज 82 धावांची खेळी केली. आयर्लंडने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

मधल्या फळीच्या फलंदाजांनी मात्र निराशा केली. 100 धावांच्या आतच त्यांचे 6 फलंदाज तंबूत परतले. अखेरच्या फळीत कर्टिस कॅंफरने सिमी सिंग आणि अँडी मॅगब्रिन याच्यासोबत भागीदाऱ्या रचल्या. या जोरावर आयर्लंडने 212 धावांचा टप्पा पार केला. कॅंफरने या सामन्यात 68 धावांची उपयुक्त खेळी केली. इंग्लंडकडून फिरकीपटू आदिल रशीदने; तर डेव्हिड विली-साकीब महमूद या जोडीने प्रत्येकी दोन-दोन; तर टोपले-विन्स जोडीने प्रत्येकी एक एक विकेट मिळविली. शिवाय प्रत्युत्तरादाखल इंग्लंडची सुरुवातही निराशाजनक झाली; मात्र दुसऱ्या बाजूने जॉनी बेअरस्टोने इतर फलंदाजांसोबत धावांचा टप्पा पार केला. याच प्रयत्नांच्या जोरावर इंग्लंडने आयर्लंडचं आव्हान 33 व्या षटकात पूर्ण करत सामना आणि मालिकेत विजय मिळविला. आयर्लंडकडून जोश लिटिलने सर्वाधिक तीन विकेट्‌स मिळविल्या आहेत.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News