वेस्ट इंडिजला धूळ चारून इंग्लंडने विल्डन चषकावर कोरले नाव

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 30 July 2020
  • कोरोना वायरसमुळे उद्भवलेल्या चार महिन्यांच्या लॉकडाऊननंतर विल्डन चषकाच्या माध्यमातून जैविक सुरक्षित वातावरणात अखेर आंतरराष्ट्रीय क्रिकेटला सुरुवात झाली.
  • इंग्लंडने पहिली कसोटी ११३ धावांनी गमावल्यानंतर आता पुनरागमन करताना पुढील दोन्ही कसोटी आपल्या नावे केल्या आहेत.

मँचेस्टर :  कोरोना वायरसमुळे उद्भवलेल्या चार महिन्यांच्या लॉकडाऊननंतर विल्डन चषकाच्या माध्यमातून जैविक सुरक्षित वातावरणात अखेर आंतरराष्ट्रीय क्रिकेटला सुरुवात झाली. इंग्लंडने पहिली कसोटी ११३ धावांनी गमावल्यानंतर आता पुनरागमन करताना पुढील दोन्ही कसोटी आपल्या नावे केल्या आहेत. इंग्लंडच्या टीमने स्टुवर्ट ब्रॉडच्या नेतृत्वाखाली पावसाच्या व्यत्ययानंतरही तिसऱ्या व शेवटच्या कसोटीत वेस्ट इंडिजचा २६९ धावांनी पराभव करून २-१ ने मालिका जिंकली.

अश्याप्रकारे मागच्यावेळेस विल्डन चषक गमावलेल्या इंग्लंडने पुन्हा एकदा या चषकावर आपले नाव कोरले आहे. इंग्लंडने वेस्ट इंडीज समोर विजयासाठी ३९९ धावांचे लक्ष ठेवले होते. या ३९९ धावांच्या लक्षाचा पाठलाग करताना पाचव्या व शेवटच्या दिवशी मंगळवारी वेस्ट इंडिजने २ बाद १० धावांनी पुढे खेळण्यास सुरुवात केली. कॅरेबियन संघाचा संपूर्ण संघ १२९ धावात गारद झाला. पावसामुळे चौथ्या दिवशी सामना रद्द झाला. त्यानंतर मागील दोन्ही सामन्यात सर्वोत्तम कामगिरी करणारा स्टुवर्ट ब्रॉडने तिसऱ्या कसोटीत अर्धशतकासह १० विकेट्स मिळवले.

ब्रॉडने पहिल्याच तासात वेस्ट इंडिजचा सलामी फलंदाज क्रेग ब्रेथवेटला माघारी धाडून आपले ५०० विकेट्स पूर्ण केले. त्यानंतर स्टुवर्ट ब्रॉड क्रिकेट इतिहासात ५०० विकेट्स घेणारा सातवा गोलंदाज ठरला आहे.  क्रिस वॉकसननेही वेस्ट इंडिज सोबतच्या दुसऱ्या डावात पाच विकेट्स मिळवल्या. तसेच इंग्लंडच्या इतर गोलंदाजांनेही ह्या मालिकेत शिस्तप्रिय गोलंदाजी करत दुसऱ्या डावात ३७.१ षटकात फक्त एक अतिरिक्त धाव दिली. इंग्लंडच्या क्रिकेट इतिहासात १९१२ सालानंतर पहिल्यांदाच कसोटी मालिकेत इंग्लंच्या वेगवान गोलंदाजांनी एकत्रितपणे ५० पेक्षा अधिक विकेट्स मिळवले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News