इंजीनियर्स डे स्पेशल: देशातील टॉप 10 अभियांत्रिकी महाविद्यालय; जाणून घ्या कसा मिळेल प्रवेश

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 15 September 2020

अभियांत्रिकी शिक्षण संस्थांचे मूल्यांमापन करून महाविद्यालयांना रँकींग देण्याचे अधिकार नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकींग फ्रेमवर्क (NIRF) संस्थेला आहेत.

मुंबई : भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जन्म दिवस 15 सप्टेंबर रोजी झाला. त्याचा जन्म दिवस 'इंजीनियर्स डे' म्हणून संपूर्ण भारतात साजरा केला जातो. त्यानिमित्ताने भारतातील टॉप 10 अभियांत्रिकी महाविद्यालयांची सविस्तर माहिती सांगणार आहोत. अभियांत्रिकी शिक्षण संस्थांचे मूल्यांमापन करून महाविद्यालयांना रँकींग देण्याचे अधिकार नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकींग फ्रेमवर्क (NIRF) संस्थेला आहेत. 29 सप्टेंबर 2015 रोजी संस्थेला अधिकृत मान्यता मिळाली. सर्वप्रथम अभियांत्रिकी महाविद्यालयांचे मूल्यांकन 4  एप्रिल 2016 रोजी करण्यात आले. 2020 सालची एनआयआरएफने देशातील अभियांत्रिकी महाविद्यालयांची यादी प्रसिद्ध केली. त्यातील टॉप 10 महाविद्यालयांची माहिती जाणून घेऊया... 

देशातील टॉप 10 अभियांत्रिकी महाविद्यालय 

1. भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT), मद्रास
2. भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT), दिल्ली 
3. भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT), पवई
4. भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT), कामपूर
5. भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT), खडकपूर
6. भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT), रुडकी
7. भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT), गुवाहाटी 
8. भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT), हैद्राबाद
9.  राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (NIT), तिरुचिराप्पल्ली
10.  भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT), इंदौर

कशी ठरवली जाते रँकींग

अभियांत्रिकी महाविद्यालयातील शिक्षण पद्धती, आकलन क्षमता, संसाधन, प्रॅक्टिकल, दूरगामी परिणाम इत्यादी घटकांचा अभ्यास करुन एनआयआरएफ एक यादी तयार करते. या द्वारे महाविद्यालयांना रँकींग दिली जाते.  

कसा मिळणार प्रवेश

टॉप 10 महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी जॉइन्ट इनट्रन्स इक्झाम (JEE) मेन आणि जेईई ॲडव्हान्स प्रवेश पुर्व परीक्षा द्यावी लागते. जेईईमध्ये मेन परीक्षेत टॉप मिळविलेल्या 3 लाख 50 हजार विद्यार्थ्यांना जेईई ॲडव्हान्स परीक्षेला बसता येते. ॲडव्हान्स परीक्षेत टॉप करणाऱ्या विद्यार्थ्याना आयआयटीमध्ये प्रवेश दिला जातो. 

एम. विश्वेश्वरय्या यांच योगदान

भारतरत्न एम. विश्वेश्वरय्या यांनी देशातील कृष्णराज सागर डॅम, भद्रावती लोखंड आणि स्टील वर्क कंपनी, मैसूर संदल ऑईल आणि सोप कंपनी, मैसूर विद्यापीठ, बँक ऑफ म्हैसूरची स्थापना केले. त्यामुळे विश्वेश्वरय्या यांचे देशाच्या विकासात मोलाचे योगदान आहे. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून संपूर्ण देशभर अभियंता दिवस साजरा केला जातो. सरकारने 1955 साली देशाचा सर्वोच्च सन्मान पुरस्कार भारतरत्न देऊन गौरव केला. 15 सप्टेंबर 1861 साली कोलार जिल्ह्यातील चिक्काबदल्लापूर तालुक्यात विश्वेश्वरय्या यांचा जन्म झाला. त्यांचे वडील श्रीनिवास विद्वान संस्कृत पंडित आणि आयुर्वेद चिकित्सक होते. विश्वेश्वरय्यांनी प्राथमिक शिक्षण आपल्या मुळ गावी घेतले. त्यानंतर बैगलौर येथील सेट्रल महाविद्यालयात प्रथम क्रमांक मिळवून बी. ए पुर्ण केले. शिक्षणाचे महेर घर पुणे येथे सायन्स महाविद्यालयात अभियांत्रिकीसाठी प्रवेश घेतला. 1883 साली एलसीई आणि एफसीई प्रथम क्रमांकात पदवी प्राप्त केली. गुणवत्तेच्या आधारावर महाराष्ट्र सरकारने नाशिक येथे सहाय्यक अभियंता या पदावर त्यांची नियुक्ती केली. त्यामुळे राज्याला विद्धान अभियंता लाभला.    
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News