पब्जी गेमचा द इन्ड; आता तरुणाई काय करणार?

स्वप्नील भालेराव (सकाळ वृत्तसेवा- यिनबझ)
Monday, 7 September 2020
  • आजची चर्चा, माझा अधिकार, माझे मत…
  • सुरक्षेच्या कारणावरून भारत सरकारने 118 चिनी ॲपवर बंदी घातली, या ॲपमध्ये तरुणाईचा आवडता पब्जी मोबाईल गेमचा समावेश होता.

मुंबई : सुरक्षेच्या कारणावरून भारत सरकारने 118 चिनी ॲपवर बंदी घातली, या ॲपमध्ये तरुणाईचा आवडता पब्जी मोबाईल गेमचा समावेश होता. त्यामुळे पब्जी गेमचा द इन्ड झाला. अशा परिस्थितीत तरुणाई काय करणार? या विषयावर यिनबझच्या विविध व्हॅट्सअॅप ग्रुपवर चर्चा करण्यात आली. त्यातील विद्यार्थ्यांनी दिलेल्या काही निवडक प्रतिक्रिया आम्ही देत आहोत. 

पब्जीमुळे तरुणाई अक्षरशा वेडी झाली होती. मुले रस्त्यावर, ट्रॅफिकमध्ये कुठेही गेम खेळत होती. त्यांच सर्व लक्ष गेममध्ये असायचं. कितीतरी मुलांनी आत्महत्या केली. अखेर पब्जी गेम सरकारने बंद केला. पण त्याला पर्यायी दुसरे गेम आले. जितका वेळ अभ्यासाला मुले देत नाहीत त्याच्या कितीतरी जास्त वेळ गेम खेळण्यात घालवतात. ज्या युवकांच्या हातात देशाच भविष्य आहे. तेच युवक आज अधोगतीच्या मार्गांवर चालताना दिसतात. ही अत्यंत दयनीय स्थिती आहे. सरकारने सर्वच गेम साईटवर बंदी घालायला पाहिजे. तरच आगामी तरुण पिढी या विळख्यातून सुटतील.
- कृष्णा गाडेकर, वय 22, आयटीआय, ता. किनवट जि. नांदेड

पब्जी बंद झाला तरी पब्जीसारखे अनेक गेमचे पर्याय उपलब्ध आहेत. मात्र पब्जीची लोकप्रियता इतर गेमला मिळाली नाही. पब्जी बंद झाल्यामुळे थोडासा नरवस आहे. पब्जी सारखे विविध गेम येतील आणि जातील मात्र देशाची सुरक्षितता आमच्यासाठी महत्त्वाची आहे. 
-रुपेश गायकवाड, वय 22, बी. ए. द्वितीय वर्षे, सरस्वती कला महाविद्यालय ता. किनवट जि. नांदेड 

लॉकडाऊन काळात करमणुकीचे साधन नव्हते, त्यामुळे पब्जी गेम खेळण्याचा मार्ग स्वीकारला. आता हळूहळू परिस्थिती पुर्वपदावर येत आहे. त्यामुळे आम्ही कामात व्यक्त होत आहेत. पुर्वी सारखा निवांत वेळ मिळत नाही. त्यामुळे पब्जी खेळणे कमी झाले आता तर सरकारणे पब्जीवर बंदी घातली, त्यामुळे खेळण्यात प्रश्नचं निर्माण होत नाही.
- दिनेश वाघमारे, वय 19, स्वंयमरोजगार

पब्जी बंद झाला त्यामुळे पब्जीगेमर्सवर मोठ्ठं संकट आले. भारतीय गेम बनवणाऱ्या कंपणीने असा उपक्रम सुरू करावा की ज्यामुळे तरुणांची दिशा व देशाची प्रगती होईल.
- दत्ता जाधव, वय 30, तरुण उद्योजक, कुकुटपालक

पब्जी गेम बंद झाला पण त्याला दुसरा पर्याय येईल. तरुणांमध्ये इतका addicted होता की, सगळ्यांनी कुठे ना कुठे तरी याचा अनुभव घेतला असेल. ऑनलाईन गेमिंगच मार्केट खुप मोठं आहे पण त्याचा अतिवापर झाल्यामुळे मुलांच्या मानसिकतेवर परिणाम होतात. काही तरुणांनी आपला जीव गमावला. आता तरुणाईने ऑनलाईन गेम सोडून मैदानी खेळाकडे वळाले पाहिजे, त्यामुळे त्याची स्वास्थ्य चांगले राहते. Addicted गेम न खेळता बुद्दीला चालना देणारे खेळ तरुणाईने खेळावे जसे की chess. आता तरुणाईने मैदानी खेळाकडे वळावे. 
- प्रतिक भालेराव, वय 24, अभियांत्रिकी पदवीधर, गुरु गोविंगसिंग अभियांत्रीकी महाविद्यालय, नांदेड (autonomous college) 

दुचाकी चालवायचा परवाना 16 व्या वर्षी तर चार चाकी गाडी चालवायचा परवाना 18 व्या वर्षी शासन देते. पण मोबाईल चालण्याचा परवाना कुणीच देत नाही. तो परवाना  पालकांनी द्यायचा असतो आणि तो त्यांनी विचारपूर्वक योग्य वयात दिला की सगळं व्यवस्थित होईल आणि यामुळे मुलं मैदानी खेळा कडे नक्कीच  वळतील.
- उत्कर्ष भोसीकर, वय 28, सिव्हील पदवीधर, महात्मा गांधी अभियांत्रिकी महाविद्यालय, नांदेड. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News