हैद्राबादसारखं एन्काऊंटर करणे गरजेचे

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 10 February 2020
  • गेल्या आठवड्यात महाराष्ट्रात वर्धा जिल्ह्यात तरुणीवर पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न, औरंगाबादमधील घटना, मीरा भायंदरची घटना, पनवेल येथील घटना आणि माटुंगा येथील घटना एका आठवड्यात एवढ्या घटना देशात आणि प्रामुख्याने महाराष्ट्रात महिला आणि मुली किती सुरक्षित आहेत याच दर्शन घडतंय. 

गेल्या आठवड्यात महाराष्ट्रात वर्धा जिल्ह्यात तरुणीवर पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न, औरंगाबादमधील घटना, मीरा भायंदरची घटना, पनवेल येथील घटना आणि माटुंगा येथील घटना एका आठवड्यात एवढ्या घटना देशात आणि प्रामुख्याने महाराष्ट्रात महिला आणि मुली किती सुरक्षित आहेत याच दर्शन घडतंय. 

हिंगणघाट येथील पीडितेचा मृत्यू झाला. तरुणीने अखेर हार मानली पण अजून किती मुली अन्याय सहन करणार त्यामुळे हैद्राबाद पोलीसांनी जे केलं तसच यालाही जागेवरच शिक्षा द्यायला हवी. न्याय व्यवस्था पुरावे शोधून पडताळणी करून त्यांना शिक्षा करून न्याय भेटला असता तर निर्भयाला न्याय त्याच वेळी भेटला असता ९ वर्ष लागली नसती. मी गुन्हा करताना प्रौढ नव्हतो अल्पवयीन हे बोलण्याची गुन्हेगाराची हिम्मतच झाली नसती. किंवा त्याचे वकील असे बोलले नसते निर्भयाच्या आईला गुन्हेगारांना माफ करा हे सांगण्याची त्या वकिलांची ची हिम्मत झाली नसती. त्यामुळे जे हैद्राबाद पोलीसांनी केल तेच योग्य आहे.

गीता बाबर -कोकण कृषी विद्यापीठ दापोली 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News