‘जॉब फेअर’ मधून रोजगाराची संधी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 14 January 2020
  • सिंधी समाजातर्फे समाजोपयोगी विविध उपक्रम सुरू असतात. बाल संस्कारापासून करिअर गायडन्स, रोजगार मिळेपर्यंत मार्गदर्शन केले जाते. आरोग्यविषयक शिबिर घेतले जातात. समाजाचे हित हेच आमचे लक्ष आहे.

जळगाव :  येथील सिंधी समाजाच्या विविध पंचायतीतर्फे जॉब फेअरच्या माध्यमातून दोनशे जणांना रोजगार दिला आहे. यात ऑटोमोबाईल, आय. टी. क्षेत्र, डेअरी क्षेत्र, कार्पोरेट क्षेत्रात युवकांना त्यांच्या शिक्षणाप्रमाणे रोजगाराची संधी देण्यात आली आहे.

पाचशे जणांचे रक्तदान
जळगाव शहरात सिंधी समाजबांधवांची संख्या मोठी आहे. गुण्यागोविंदाने राहणारे समाजबांधव समाजाच्या हितासाठीही सर्वंकष प्रयत्न करतात. उबुराव भावलपूर पंचायतीतर्फे दरवर्षी समाजाभिमुख उपक्रम राबविली जातात.पंचायतीतर्फे रक्तदान शिबिर घेण्यात आले. त्यात ५०० जणांनी रक्तदान केले. अनेकांना गुडघ्याच्या व्याधी असतात. यामुळे गुडघे दुखीवर उपचार व निदान शिबिरही झाले. कॅन्सर जनजागृतीपर मोहीम राबविण्यात येते. ज्या सिंधी बांधवांना कॅन्सर झाल्याचे निदान होते, त्यांना तत्काळ २५ हजारांची मदत दिली जाते. सोबत त्या व्यक्तीची इतर सोयही केली जाते.

 व्यापाऱ्यांना मार्गदर्शन
‘जीएसटी’बाबत व्यापाऱ्यांमध्ये अनेक प्रश्‍न, समस्या असतात. त्या सोडविण्यासाठी जीएसटीच्या अधिकाऱ्यांना बोलावून त्यांचे मार्गदर्शन शिबिर झाले. त्यात व्यापाऱ्यांनी आपल्या शंकांचे निरसन करून घेतले. ‘योगा इंटरनॅशनल डे’च्या दिवशी योगा करण्यात आला. सामाजिक बांधिलकी म्हणून कोल्हापूर येथे अतिवृष्टी होऊन नुकसान झालेल्यांना मदत म्हणून विविध साहित्यही मदत म्हणून पाठविले. 

मतदानाबाबत जनजागृती
भारतात लोकशाही आहे. मतदान हा प्रत्येकाचा अधिकार आहे. यामुळे प्रत्येकाने मतदान करायला पाहिजे, अशी जनजागृती लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या अगोदर समाज बांधवांमध्ये करण्यात आली.

करिअर गाईडन्स
विद्यार्थ्यांनी दहावी, बारावीनंतर कोणत्या शाखेकडे वळावे, कोणता व्यवसाय करावा, याबाबत विद्यार्थ्यांना करिअर गायडन्स शिबिर घेण्यात आले होते. यामुळे विद्यार्थ्यांना त्यांचा कल ओळखता आला. दहावी, बारावी, पदवीधरांचा सत्कारही दरवर्षी केला जातो.  

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News