अकरावी ऑनलाईन प्रवेशासाठीचे  संकेतस्थळ सुरु

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 1 July 2020

मुंबई महानगर क्षेत्र तसेच महाराष्ट्रातील इतर काही जिल्ह्यांमध्ये अकरावीची प्रवेश प्रक्रिया ही ऑनलाईन होत असते. कोरोना विषाणूच्या संकटामुळे यंदा दहावीचे निकाल हे जुलै महिन्याच्या शेवटी लागतील असे सांगण्यात आले आहे.

मुंबई : मुंबई महानगर क्षेत्र तसेच महाराष्ट्रातील इतर काही जिल्ह्यांमध्ये अकरावीची प्रवेश प्रक्रिया ही ऑनलाईन होत असते. कोरोना विषाणूच्या संकटामुळे यंदा दहावीचे निकाल हे जुलै महिन्याच्या शेवटी लागतील असे सांगण्यात आले आहे. अकरावीच्या २०२०-२१ ह्या शैक्षणिक वर्षाकरिता ऑनलाईन प्रवेशाचे संकेतस्थळ उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांकरिता १ जुलै पासून सुरु करण्यात आले आहे.

नव्याने निर्माण झालेली महाविद्यालये तसेच या पूर्वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत सहभागी असणारी महाविद्यालये यांची नोंदणी ह्या संकेत स्थळावर करण्यात येणार आहे. एमएमआर क्षेत्रात असलेल्या महाविद्यालयांना संकेत स्थळावर नोंदणी करता येणार आहे. संकेत स्थळावर महाविद्यालयांच्या नोंदणीसाठी लागणारे लॉगिन आयडी आणि पासवर्ड हे १ जुलै पासून महाविद्यालयांच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर पाठवण्यात येतील अशी माहिती शिक्षण उपसंचालक राजेंद्र अहिरे यांनी दिली आहे. २०२०-२१ साठी अकरावी ऑनलाईन प्रवेशाच्या संकेत स्थळावर उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना त्यांच्या शिक्षण संस्थेत अकरावीच्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेली जागा, विषय बदल, वाढीव तुकडी आदी माहिती संदर्भांत बदल करता येणार आहेत.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News