अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 11 August 2020
  • तब्बल एक महिन्याच्या विलंबानंतर २८ जुलै रोजी महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला.
  • त्याआधी २६ जुलै पासून विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज भाग १ भरण्याचा वेळ देण्यात आला होता.

मुंबई :- तब्बल एक महिन्याच्या विलंबानंतर २८ जुलै रोजी महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला. त्याआधी २६ जुलै पासून विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज भाग १ भरण्याचा वेळ देण्यात आला होता. काल १० ऑगस्ट रोजी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण विभागाचे संचालक दिनकर पाटील यांनी प्रवेश प्रक्रियेच्या वेबसाईटवर पुढील अकरावी ऑनलाईन प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर केले आहे. यावेळापत्रकानुसार दहावी उत्तीर्ण करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना १२ ऑगस्ट पासून प्रवेश अर्जाचा भाग दोन भरायचा आहे. ह्या प्रवेश अर्जात विद्यार्थ्यांनी त्यांचा कॉलेज पसंती क्रम भरायचा आहे. प्रवेश अर्जाचा भाग २ भरण्याची तारीख ही २२ ऑगस्ट असून या दरम्यान अल्पसंख्यांक तसेच इनहाऊस विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. शिक्षण संचालयनाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार अकरावी ऑनलाईन प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी ही ३० ऑगस्ट ला जाहीर केली जाणार आहे. केंद्रीय प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक हे मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर आणि पिंपरी चिंचवड या क्षेत्रांकरीता लागू असेल. ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जाचा भाग १ भरणे शक्य झाले नाही ते विद्यार्थी दोन ही प्रवेश अर्ज एकत्रितपणे भरू शकतात. 

१२ ते २२ ऑगस्ट या दरम्यान विद्यार्थ्यांना पहिल्या नियमित गुणवत्ता यादीसाठी कॉलेज पसंती क्रम निवडायचा आहे. त्याच बरोबर शिक्षण संस्थांना अन्य कोट्यांअंतर्गत येणारे प्रवेश पूर्ण करायचे आहेत. २३ ते २५ ऑगस्ट दरम्यान अकरावी प्रवेशाची पहिली संभाव्य यादी जाहीर करण्यात येईल. या यादीत पात्र असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचा समावेश असून यादीवर हरकती किंवा आक्षेप विद्यार्थ्यांना नोंदवता येईल. त्यानंतर अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येईल . ही यादी जाहीर झाल्यावर ३ सप्टेंबर पर्यंत विद्यार्थ्यांना आपला प्रवेश निश्चित करता येणार आहे.  

पहिल्या गुणवत्ता यादीत विद्यार्थ्याला त्याच्या प्रथम पसंती क्रमानुसार कॉलेज मिळाले असे तर विद्यार्थ्यांना त्या कॉलेजमध्ये प्रवेश घेणे बंधनकारक असणार आहे.  परंतु विद्यार्थ्याने त्याचा प्रवेश निश्चित केला नाही तर मात्र त्या विद्यार्थ्यास विशेष फेरी पर्यंत थांबावे लागणार आहे. परंतु ज्यांनी पहिल्या फेरीत पहिला सोडून इतर पसंती क्रमांकाचे कॉलेज मिळून सुद्धा प्रवेश निश्चित केले नाही अशा विद्यार्थ्यांना पुढील फेरीमध्ये सहभागी होता येईल. शिक्षण संचालयनाच्या वेबसाईटवर सध्या फक्त पहिल्या गुणवत्ता यादी पर्यंतचेच वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून यापुढील प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक नंतर जाहीर करण्यात येणार आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News