अकरावीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला सुरुवात

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 1 August 2020

तीन महिन्यानंतर विद्यार्थ्यांना आवश्यक कागदपत्रे देणे बंधनकारक राहिल असही मीना शेंडकर यांनी सांगितले. 

अकरावीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला सुरुवात

पुणे - दहावीचा निकाल जाहीर झाल्यापासून राज्यभरात विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतं आहे. आज पासून पुण्यात अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून यावेळी विद्यार्थ्यांना गुणपत्रिकेद्वारे अर्ज भरण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसेच गुणपत्रिके शिवाय इतर कोणत्याही कागदपत्राची सक्ती केली जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. अधिकृत संकेतस्थळावर गेल्यानंतर तिथे लॉग इन आयडी आणि पासवर्ड टाकून अर्ज भरता येईल. 

अर्ज भरताना शुल्क भरून झाल्यानंतर तुम्ही भरलेला अर्ज ब्लॉक करणे अनिवार्य आहे. तसेच अर्जात भरलेली माहिती चेक करून पाहणे देखील तितकेच गरजेचे आहे. पुण्यातील पिंपरी-चिंचवड परिसरात प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. पुण्यात ३०४ महाविद्यालय, कला शाखा -१५५८१, वाणिज्य - ४२७५५, विज्ञान - ४३,९८१, एमसीव्हीसी – ४४९५ अशी महाविद्यालयांची प्रवेश क्षमता आहे. 

कोरोनाचा संसर्ग महाराष्ट्रात अजूनही सुरूचं असल्याने यावर्षी विद्यार्थ्यांना सोयिस्कर होईल अशा पध्दतीन अर्ज प्रक्रिया राबिवली जात आहे. ऑनलाइन मिळालेल्या गुणपत्रिकेद्वारे तुम्हाला अर्ज भरता येणार असून इतर कागदपत्राची गरज लागणार नसल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे अशी माहिती नियंत्रण समितीच्या सचिव मीना शेंडकर यांनी माहिती सांगितली. 

ज्या विद्यार्थ्यांकडे कागदपत्रे उपलब्ध असतील त्यांनी ती अपलोड केली तरी चालतील, पण ज्यांच्याकडे कागदपत्रे नाहीत, अशा विद्यार्थींनी आपल्या मार्कलिस्टच्या आधारे अर्ज भरावा. कोणताही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहू नये, यासाठी ही प्रक्रिया राबिविली जात आहे. तीन महिन्यानंतर विद्यार्थ्यांना आवश्यक कागदपत्रे देणे बंधनकारक राहिल असही मीना शेंडकर यांनी सांगितले. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News