अकरावीची प्रवेश प्रक्रीया सुरु? अशी करा नोंदणी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 16 July 2020

२४ जुलै पासून ऑनलाईन सराव अर्ज सुरु होणार आहे. त्यासाठी शालेय शिक्षण विभागाने जय्यत तयारी केली. ज्या विद्यार्थ्यांना अकरावीला प्रवेश घ्यायचा आहे त्यांनी सराव अर्ज भरुन प्रवेश प्रक्रीया समजून घ्यावी त्यामुळे प्रत्यक्ष प्रवेश अर्ज भरताना समस्या येणार नाहीत

मुंबई : दहावीचा निकाल लागला की, अकरावीच्या प्रेवशाकरिता विद्यार्थी आणि पालकांची धावपळ सुरु होते. चांगल्या महाविद्यालयात विद्यार्थ्यांना प्रवेश मिळावा यासाठी पालक आणि पाल्य धडपडत असतात. त्यामुळे विद्यार्थी आणि पालक गोंधळून जातात. अशा परिस्थितीत अकरावीचा प्रवेश अर्ज भरताना अनेक चुका होतात. यामुळे प्रवेश प्रकियेला विलंब होतो. प्रवेश प्रक्रीयेचा फार्म भरताना विद्यार्थ्यांकडून चुका होऊ नये, याकरिता शालेय शिक्षण विभाग सराव अर्ज  भरुन घेणार आहे. २४ जुलै पासून ऑनलाईन सराव अर्ज सुरु होणार आहे. त्यासाठी शालेय शिक्षण विभागाने जय्यत तयारी केली. ज्या विद्यार्थ्यांना अकरावीला प्रवेश घ्यायचा आहे त्यांनी सराव अर्ज भरुन प्रवेश प्रक्रीया समजून घ्यावी त्यामुळे प्रत्यक्ष प्रवेश अर्ज भरताना समस्या येणार नाहीत.

यंदा अकरावीची प्रवेश प्रक्रीया २६ जुलै पासून सुरु होणार आहे. मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर या सहा महानगरपालिका कार्यक्षेत्रात ऑनलाईन प्रवेश प्रक्रीया राबविली जाणार आहे. त्यासाठी https://mumbai.11thadmission.org.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी लागणार आहे.
 

ऑनलाईन सराव प्रवेश प्रक्रीया 

विद्यार्थ्यांनी  https://mumbai.11thadmission.org.in/Mock.Demo.Registration या संकेतस्थळावर जाऊन सराव ऑनलाईन प्रवेश अर्ज भरायचा आहे. प्रवेश नोंदणीसाठी भाग-१ विद्यार्थ्यांनी भरायचा आहे. त्यानंतर गेल्यावर्षी महाविद्यालयांना दिलेला पासवर्ड आणि लॉगईन आयडी वापरुन विद्यार्थ्यांच्या प्रेवश अर्जाची तापसणी करायची आहे. विद्यार्थ्यांच्या अर्जात काही त्रुटी आढळल्यास त्यांना मोबाईल वरुन संपर्क करावा. आणि त्रुटी दुर करुन घ्यावे असे आवाहन प्रवेश परीक्षा नियंत्रक समितीकडून करण्यात आले. 

  • विद्यार्थ्यांनी ऑनलाईन प्रवेश प्रक्रीया करताना अर्ज क्रमांक १ भरावा. त्यानंतर अर्ज पडताळणीसाठी शाळा, महाविद्यालयाची निवड करावी. निवड केल्यानंतर आपला अर्ज व्यवस्थित तपासला आहे का? याची खात्री करुन घ्यावी.
  • विद्यार्थ्यांनी भरलेल्या प्रवेश अर्जाची तपासणी महाविद्यालयांनी करावी. अर्जात काही त्रुटी आढळल्यास विद्यार्थ्यांशी मोबाईल वरुन संपर्क करुन माहिती द्यावी. 
  • दहावी एसएससीचा निकाल लागण्यानंतर भाग क्रमांक २ भरायचा आहे. भाग क्रमांक दोनमध्ये महाविद्यालयांची पसंतीक्रमांक भरुन अर्ज सबमीट करायचा आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News