अकरावी प्रवेश प्रक्रीया: 'या' निर्णयामुळे रांगा लावण्यापासून सुटका; वेळ, पैसा, श्रम यांची बचत होणार

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 1 August 2020
  • कशी राबवली जाणार प्रवेश प्रक्रीया

  • प्रवेश प्रक्रीयेच्या तारखा जाहीर

 

सोलापूर : दहावीचा निकाल लागला की, अकरावीच्या प्रवेशाकरिता पालक आणि विद्यार्थ्यांची लगबग सुरु होते. अकरावीच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना महाविद्यालयात लांब रांगा लावाव्या लागतात. त्यामुळे महाविद्यालयाच्या परिसरात प्रचंड गर्दी होत असते. राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचा संसर्ग वाढत आहे, प्रत्यक्ष महाविद्यालयात उपस्थीत राहून प्रवेश प्रक्रीया राबवणे शक्य नाही, त्यामुळे ऑनलाईन प्रवेश प्रक्रीया राबण्याचा निर्णय घेण्यात आला. शैक्षणिक वर्षे २०२०-२१ साठी अकरावीचे प्रवेश ऑनलाईन पद्धतीने होणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना रांगा लावण्यापासून सुटका मिळणार आहे. तसेच वेळ, पैसा, श्रम यांची बचत होणार आहे. 

कशी राबवली जाणार प्रवेश प्रक्रीया

शिक्षण विभागाने सर्व महाविद्यालयांच्या प्राचार्यांची एक बैठक आयोजिक केली होती. यावेळी ऑनलाईन प्रवेश प्रक्रीया राबवण्याच्या सुचना प्राचार्यांना देण्यात आल्या. विद्यार्थ्यांना ऑनलाईन नोंदणी महाविद्यालय आपल्या संकेतस्थळावर लिंक उपलब्ध करुन देणार आहे. विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या संकेतस्थळावर जावून नोंदणी करायाची आहे. त्यानंतर गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल. गुणवत्तेप्रमाणे विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. विद्यार्थ्यांना कागदपत्र सादर करण्यासाठी आणि फी भरण्यासाठी विशिष्ठ वेळात महाविद्यालयात बोलवले जाईल. गर्दी टाळण्यासाठी विद्यार्थ्यांना सकाळ, दुपार दोन टप्प्यात बोलावले जाणार आहे. ज्या विद्यार्थ्यांचे गुणवत्ता यादीत नाव आहे अशा विद्यार्थ्यांना संपर्क करणे, कागदपत्र तपासणे, त्याच्या आडचणी सोडवण्याची जबबदारी शिक्षणकांवर देण्यात आली.

प्रवेश प्रक्रीयेच्या तारखा

  • ३१ जुलै - १३ ऑगस्ट नाव नोंदणी करणे
  • १४- १९ ऑगस्ट नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचे अर्ज तापसणे
  • २० ऑगस्ट पहिली गुणवत्तायादी जाहीर करणे व प्रवेश देणे
  • ३१ ऑगस्ट दुसरी गुणवत्तायादी जाहीर करणे व प्रवेश देणे
  • ७ सप्टेंबर तीसरी गुणवत्तायादी जाहीर करणे व प्रवेश देणे
कोरोनामुळे यंदा ऑलाईन प्रवेश प्रक्रीया होणार आहे. ३१ जुलैपासून प्रवेश प्रक्रीयेला सुरुवात झाली. ३१ ऑगस्ट पर्यंत ही प्रवेश प्रक्रीया चालणार आहे. त्यानंतर १० सप्टेंबरला महाविद्यालय सुरु होण्याची शक्यता आहे. प्रवेशापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही याची खबरदारी महाविद्यालयांनी घेतील आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे.
-
सुधा साळुंके, शिक्षणाधिकारी, सोलापूर 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News