निवडणूक प्रतिनियुक्‍तीवरील कर्मचाऱ्यांनो विद्यापीठात या; अन्यथा...

अतुल पाटील, औरंगाबाद
Sunday, 15 December 2019

अन्यथा डिसेंबर महिन्याचे वेतन होईल स्थगित

औरंगाबाद - लोकसभा, विधानसभा निवडणुकीसाठी औरंगाबादच्या तहसील कार्यालयात प्रतिनियुक्‍तीवर गेलेल्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ हजर व्हावे; अन्यथा डिसेंबर महिन्याचे वेतन स्थगित करण्यात येईल, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ प्रशासनाने ठणकावले आहे.

विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव यांनी 9 डिसेंबरला पत्रक काढले आहे. लोकसभा, विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदारसंघातील छायाचित्र मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनर्रीक्षन कार्यक्रमासाठी औरंगाबाद तहसील कार्यालयात प्रतिनियुक्‍तीवर असलेल्या कर्मचाऱ्यांनी विद्यापीठात रुजू व्हावे. आता निवडणुका संपल्या आहेत. विद्यापीठाचे अपुरे मनुष्यबळ लक्षात घेता, त्यांच्या सेवा आवश्‍यक आहेत. आदेश प्राप्त झाल्यानंतर तत्काळ कामावर यावे, अन्यथा डिसेंबर 
2019 पासूनचे वेतन स्थगित करण्यात येईल. याच्या प्रति संबंधितांना देण्यात आल्या आहेत.

परीक्षा विभाग, गणित विभाग, नाट्यशास्त्र विभाग, क्रीडा विभाग, डीडीयूके, निरंतर शिक्षण, प्राणीशास्त्र विभाग, ग्रंथालय, पर्यावरण विभागातील कर्मचारी, शिपाई असे 20 जण आहेत. यात डी. सी. पर्वत, आर. आर. राठोड, आर. बी. मोहिते, नीरंजन माने, किशोर सुरासे, बी. जे. लोखंडे, जे. के. देशमुख, जे. बी. शुक्‍ला, सुरेश लोखंडे, अनिल मालकर, आर. जे. तुपे, आर. के. पवार, एस. एस. पवार, व्ही. एल. पुंड, एस. वाय. गायकवाड, सचिन गाडेकर, व्ही. जी. जाधव, डी. वाय. गवळी, आर. एम. गायकवाड, आर. एस. पाखरे यांचा समावेश आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News