लवकरच महाराष्ट्रात निवडणुका होणार, आयोगाची परवानगी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 1 May 2020

महाराष्ट्रात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बिकट स्थिती असताना राज्यपालांनी निवडणूक आयोगाला निवडणुका घेण्याची विनंती केली होती. त्यांनंतर विधानपरिषद जागांवर बैठक घेण्यात आली, निवडणुकीच्या मुद्द्यावर दिल्लीत बैठक घेण्यात आली. यावेळी निवडणुक आयोगाचे दोन अधिकारी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून सहभागी झाले होते. 

मुंबई - महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून राजकीय वातावरण गढूळ झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्यातचं केंद्रीय निवडणुक आयोगाने महाराष्ट्र आमदाराकीचा पेज सोडवण्यासाठी निवडणुकीला परवानगी दिली आहे. विशेष म्हणजे कोरोना व्हायरच्या पार्श्वभूमीवर योग्य ती काळजी घेवून, निवडणूक घ्यावी अशी सुचना सुध्दा आयोगाने दिली आहे. या निवडणुकीमुळे महाविकासआघाडी सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. 

महाराष्ट्रात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बिकट स्थिती असताना राज्यपालांनी निवडणूक आयोगाला निवडणुका घेण्याची विनंती केली होती. त्यांनंतर विधानपरिषद जागांवर बैठक घेण्यात आली, निवडणुकीच्या मुद्द्यावर दिल्लीत बैठक घेण्यात आली. यावेळी निवडणुक आयोगाचे दोन अधिकारी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून सहभागी झाले होते. 

या बैठकीत अखेर आमदारकीचा पेच सोडवण्यासाठी महाराष्ट्राच्या राज्यपालांना ९ जागांवर निवडणुक घेण्याची परवानगी देण्यात आली. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना ६ महिन्यात आमदार होणं अपेक्षित होतं. पण महाराष्ट्रात कोरोनाचा शिरकाव झाला आणि निवडणूक पुढे ढकलण्यात आली. त्यामुळे महाराष्ट्रात मोठा पेजप्रसंग निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर निवडणुक आयोगाची बैठक महत्त्वपुर्ण मानली जात होती. 

दरम्यान विधानपरिषदेच्या ९ जागांसाठी २७ मे आधीच निवडणुका होतील, अशी अपेक्षा सुत्रांकडून देण्यात आली आहे. मात्र याबाबत अद्याप अधिकृत घोषणा होणं फक्त बाकी आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News