ठाण्यातील एकलव्य क्रीडा मंडळाने अनोख्या पध्दतीत स्वातंत्र्य दिन केला साजरा...

रसिका जाधव
Saturday, 15 August 2020
  • ७४ वा स्वातंत्र्य दिन देशभरात उत्साहात साजरा केला जात आहे.
  • तसेच ठाण्यातील येऊर येथील एकलव्य क्रीडा मंडळ आणि येऊर मधील मल्लखांब खेळाडू यांनी या वर्षी स्वातंत्र्य दिन अनोख्या पध्दतीत साजरा केला आहे.

ठाणे :- ७४ वा स्वातंत्र्य दिन देशभरात उत्साहात साजरा केला जात आहे. तसेच ठाण्यातील येऊर येथील एकलव्य क्रीडा मंडळ आणि येऊर मधील मल्लखांब खेळाडू यांनी या वर्षी स्वातंत्र्य दिन अनोख्या पध्दतीत साजरा केला आहे. पर्यावरणाचा आधार घेत पर्यावर्णसंगे १५ ऑगस्ट साजरा करण्यात आला आहे.

 

सर्वजण हे ध्वजारोहण हे पटांगणात साजरा करतात. पण त्यांनी पटांगणात साजरा न करता त्यांनी संजय गांधी नॅशनल पार्क, येऊर येथील मुंडा डोंगरावर जाऊन हा ध्वारोहण सोहळा साजरा केला आहे. त्यांनी त्यांच्या या कार्यातून दाखवले आहे की, ध्वजारोहण हा पर्यावर्णसंगे देखील साजरा करता येऊ शकतो. 

ध्वजारोहण सोहळ्यात मल्लखांब खेळाडू किशोर म्हात्रे, अनुप ठाकुर, गोपाळ ठाकुर, पिंट्या बरफ, स्वप्निल द्यात, विकास द्यात आणि दिपाली शिंदे इत्यादी तसेच राष्ट्रीय, राज्यस्तरीय खेळाडू देखील उपस्थितीत होते. या सर्वांच्या उपस्थितीत हा ध्वजारोहणाचा सोहळा मोठ्या उत्सहात साजरा करण्यात आला आहे.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News