८५ टक्के विद्यार्थांनी निवडला ऑनलाइन परीक्षेचा पर्याय

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 15 September 2020
  • अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याचा निर्णय झाल्या नंतर सुध्दा त्या कशा घेईच्या यावरून अनेक वाद झाले होते.
  • मग त्यावर पर्याय म्हणून ऑनलाइन आणि ऑफलाइन हा पर्याय काढला आहे.
  • सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतिम वर्षांच्या परीक्षेसाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन या पर्यायातून जवळपास ८५ टक्के विद्यार्थ्यांनी ऑनलाइन परीक्षेचा पर्याय निवडला आहे.

पुणे :- अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याचा निर्णय झाल्या नंतर सुध्दा त्या कशा घेईच्या यावरून अनेक वाद झाले होते. मग त्यावर पर्याय म्हणून ऑनलाइन आणि ऑफलाइन हा पर्याय काढला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतिम वर्षांच्या परीक्षेसाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन या पर्यायातून जवळपास ८५ टक्के विद्यार्थ्यांनी ऑनलाइन परीक्षेचा पर्याय निवडला आहे. एकूण १ लाख ८५ हजार विद्यार्थ्यांनी ऑनलाइन परीक्षेचा पर्याय निवडला असून, त्यापैकी सुमारे १ लाख ९ हजार विद्यार्थ्यांनी मोबाइलद्वारे परीक्षा देणार असल्याचे नमूद केल्याची माहिती विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने दिली.

सर्वोच्च न्यायालयाने पदवीच्या अंतिम वर्ष विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्याचे निर्देश दिले. त्यानुसार विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार विद्यापीठाने १ ऑक्टोबरपासून परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही माध्यमातून परीक्षा घेतली जाणार आहे. पण, ऑनलाइन परीक्षेसाठी सुविधांची अडचण लक्षात घेऊन विद्यापीठाने विद्यार्थ्यांची माहिती संकलित करण्यासाठी विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन यातून पर्याय निवडण्यास सांगितले होते. त्यासाठी १४ सप्टेंबपर्यंतची मुदत दिली होती. त्यानुसार सोमवार सायंकाळपर्यंत संकलित झालेल्या माहितीनुसार ८५ टक्के  विद्यार्थ्यांनी ऑनलाइन परीक्षेला पसंती दिली आहे.

विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील पुणे, नगर आणि नाशिक या जिल्ह्य़ातील महाविद्यालयांतील अंतिम वर्षांचे जवळपास २ लाख ४० हजार  विद्यार्थी आहेत. त्यातील १ लाख ८५ हजार विद्यार्थ्यांनी ऑनलाइन परीक्षेचा पर्याय निवडला. त्यापैकी १ लाख ९ हजार विद्यार्थ्यांनी मोबाइलद्वारे परीक्षा देणार असल्याचे नमूद केले आहे. इतर विद्यार्थ्यांनी लॅपटॉप, संगणक, टॅब्लेटद्वारे परीक्षा देणार असल्याचे सांगितले आहे. तर ऑफलाइन परीक्षेसाठी ३८ हजार विद्यार्थ्यांनी तयारी दर्शवली आहे, अशी माहिती परीक्षा विभागाने दिली.

ऑनलाइन परीक्षेच्या तयारीसाठी सराव चाचणीची संधी

ऑनलाइन परीक्षा अंतिम वर्ष विद्यार्थ्यांसाठी नवीन असल्याने त्यांना तयारीसाठी सुविधा दिल्या जाणार आहेत. विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांना तयारीसाठी नमुना प्रश्नसंच पुढील काही दिवसांत दिला जाणार आहे. तसेच ऑनलाइन परीक्षेची तयारी होण्याच्या दृष्टीने त्यांना सराव चाचणी परीक्षेची (मॉक टेस्ट) सुविधाही उपलब्ध करून देण्याचा निर्णय विद्यापीठाच्या प्रा. कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी यांच्या अध्यक्षतेखालील सुकाणू समितीने घेतल्याचे डॉ. काकडे यांनी स्पष्ट केले.

करोना संसर्गाच्या काळात विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जाणे हे महत्त्वाचे आहे. ऑनलाइन परीक्षेमुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य जपले जाईल. विद्यार्थ्यांचा कल ही ऑनलाइन परीक्षेकडे असल्याचे दिसून येत आहे. ऑनलाइन परीक्षेमुळे विद्यार्थी घरातूनच परीक्षा देणार असल्याने पालकांमध्ये असलेली काळजी आणि संभ्रमही दूर होईल.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News