याप्रकारची अंडा बिर्याणी कधी बनवली आहे का?

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 6 June 2019

अख्या अंडयाची बिर्याणी आपण करतोच....ही थोडी वेगळी अंडयाचे तुकडे करून केलेली बिर्याणी आहे.

अंडा बिर्याणी- (उकडुन तुकडे केलेल्या अंडयाची बिर्याणी )
अख्या अंडयाची बिर्याणी आपण करतोच....ही थोडी वेगळी अंडयाचे तुकडे करून केलेली बिर्याणी आहे. अख्ख अंड घालुन बिर्याणी होते पण तो अंडयाच flavor अजीबात येत नाही म्हणुन मी अशी बिर्याणी try केली....
एकदा तरी करून बघा....आवडेलच.
साहित्य

1) भातासाठी साहित्य-
बासमती तांदुळ 2 वाटी, 2 लवंगा, 2 मिरी दाणे, 1 मोठी मसाला वेलची, 1 पूर्ण भरलेला टी स्पून मीठ, 1 टेबल स्पून तेल.

2)    अंडा-मिश्रण साहित्य -
2 टेबल स्पून तेल,कांदे- 2 बारीक चिरून घ्या, आल्ले लसूण पेस्ट 1 टेबल स्पून, 2 हिरवी वेलची, 2 दालचिनी, 2 काळी मिरीचे दाणे, हळद 1/2 टी स्पून, लाल मिरची पावडर 2 टी स्पून, जीरे पावडर व धणे पावडर दोन्ही 1 टी स्पून, 1 टी स्पून मीठ,
टोमॅटो- 2 स्लाईस करून . 4 अंडी उकडुन, १ चे ४ तुकडे करून घ्या

3) ईतर साहीत्य-
पुदिना 1/2 वाटी,कोथिंबीर 1 वाटी बारीक चिरून घ्या,
कांदा 2 पातळ स्लाईस करून तेलात सोनेरी तांबूस तळुन घ्या,
चिमटित मावेल एवढाच गरम मसाला पावडर.

भातासाठी कृती -
वरील सर्व साहीत्य कुकर मध्ये एकत्र करावे, 2 मिनिट कुकर मध्ये मद गास वरती चांगले परतावे (याने तांदुळ चागला मोकळा आणि सडसडीत होतो). तांदुळ थोडा कमीच शिजायला हवा म्हणुन यात 3 वाटी पाणी घालून २ च शिट्ट्या करा, नतर थड करयला ठेवा.

अंडा-मिश्रण कृती-
खोलगट कडईमध्ये तेल गरम करा, ( अंडा-मिश्रण साहित्य मधील सर्व प्रमाण) यात कांदा व आल्ले लसूण पेस्ट घालून एक मिनिटांसाठी मंद आचेवर परतावे. त्यानंतर 2 हिरवी वेलची,2 दालचिनी,2 काळी मिरीचे दाणे, हळद, लाल मिरची पावडर, जीरे पावडर, धणे पावडर, थोडे पाणी घालून सर्व एकत्र पुन्हा चांगले परतावे. स्लाईस केलेले टोमॅटो घालून तेल वेगळे व्हायला सुरुवात होईपर्यंत शिजवावे. मीठ घालून झाकन घाला, आता उकडलेली अंडी काळजीपूर्वक घालून न धवलता मिश्रण बाजूला ठेवा.

आता कुकर मध्ये थर रचावेत, एक लहान जाड तळ असणारे गोल शिजवण्याचे भांडे सुदधा वापरू शकता . त्यावर 1-२ टी स्पून तूप पसरावे, त्यानंतर पहिला थर भाताचा घालावा, अंडा-मिश्रणचा एक थर अगदी प्रेमाने पसरावा, तुकडे केलेली अंडी जास्त फुटु नयेत म्हणुनच, हिरवी कोथिंबीर, पुदिन्याची पाने, गरम मसाला पावडर टाकावी, कांदा (सोनेरी तांबूस तळुलेला) घाला, त्यानंतर अजुन एक भाताचा थर घालावा. या प्रमाने आपण एक एक थर घालु शकतो, क्रम एछीक आहे. पहिल्यांदा डीश अल्यूमीनियम फाइलने सील करावी, मंद आचेवर हा कुकर एका जाड पॅन वरती ठेवा. 10 मिनिटे शिजवा. (शिटी करायची नाहीय. झांकण ठेवावे, अथवा कुकर असेल तर कुकरच्या झाकणावरची शिटी काढून टाका)

अंडा बिर्याणी खायला तयार आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News