फुटपाथवर राहणाऱ्या तरुणीची गरुढ झेप; आमदार प्रताप सरनाईक देणार पार्ट टाईम नोकरी, फ्लॉट

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 2 August 2020

आस्माला खुप अभ्यास करुन नोकरी मिळवायची आहे. आपले आई- वडील आणि कुटुंबाची परिस्थिती बदलायची आहे.

मुंबई :  आर्थिक परिस्थितीवर मात करुन १७ वर्षीय तरुणीने दहावी परीक्षेत घवघवीत यश मिळवले. तिच्या यशाबद्दल सर्व स्तरातून कौतूक होत आहे. आझाद मैदानाच्या फुटपाथवर राहून अस्माने शेख या तरुणीने स्टेट लाईट खाली दहावीचा अभ्यास केला. कोणत्याही सोई- सुविधा नसताना कठोर परीक्षम आणि जिद्दीच्या जोरावर परीक्षा दिली. दहावीचा निकाल लागला तेव्हा आस्मा चागल्या मार्काने पास झाली. आमदार प्रताप सरनाईक यांनी तरुणीच्या यशाची दखल घेऊन पोर्ट परिसरात पार्ट टाईन नोकरी आणि एमएमआयडीए मध्ये घर मिळवून देण्याचे आश्वासन दिले. 

 

अस्माचे वडील आझाद मैदानच्या शेजारी लिंबू पाणी विकण्याचा व्यवसाय करतात. त्यामुळे कुटुंबाची आर्थिक परिस्थीती बेताची आहे. आस्माला खुप अभ्यास करुन नोकरी मिळवायची आहे. आपले आई- वडील आणि कुटुंबाची परिस्थिती बदलायची आहे. त्यासाठी आस्मा वाटेल ती मेहनत करण्यासाठी तयार आहे. मात्र, तरुणीच्या मेहनतीला आर्थिक पाठबळ घेण्याची आवश्यकता आहे. सरनाईक यांनी एक ट्वीट करुन अस्माला पाठवळ देण्याची घोषणा केली. 'फुटपाथवर  गुजराण करणाऱ्या अस्मा शेखने 10 वीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवल्याबद्दल तिचे हार्दिक अभिनंदन. या गुणी मुलीच्या स्वप्नपूर्तिसाठी भविष्यात तिला पार्टटाईम नोकरी मिळवून देण्याचा तसेच एमएमआयडीएच्या माध्यमातून एक छोटेसे घर मिळवून देण्याचा मी आटोकाट प्रयत्न करणार आहे' असे ट्विट्द्वारे आमदार सरनाईक यांनी सांगितले.

आस्मा खान आणि तिच्या वडीलांनी सरनाईक यांचे आभार मानले. समाजात अनेक गरजवंत विद्यार्थी आहेत. त्यांना लोकप्रतिनिधींनी मदत केली तर विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल होईल. आमदार सरनाईक यांनी दिलेले आश्वासन केव्हा पु्र्ण होईल हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News