‘शिक्षण हा आपल्या आयुष्यातील खूपच महत्त्वाचा पैलू आहे - अभिनेता नमित दास

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 7 January 2020

शिक्षण क्षेत्रात काहीतरी करण्याची इच्छा असून शिक्षणासाठी एक पाऊल पुढे टाकले आहे. त्याने नुकतीच त्याची टीम आणि त्याच्या घरी काम करत असलेल्या कामगारांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली आहे.

अभिनेता नमित दासने ‘सुई धागा’, ‘पटाखा’, ‘वेकअप सीड’ यांसारख्या चित्रपटात आपले अभिनयकौशल्य दाखवले. चित्रपटांबरोबर तो नाटक, मालिका आणि वेबसीरिजमध्येही झळकला. अभिनयाबरोबर नमित शिक्षणालाही तेवढेच प्राधान्य देताना दिसतो.

त्याची शिक्षण क्षेत्रात काहीतरी करण्याची इच्छा असून शिक्षणासाठी एक पाऊल पुढे टाकले आहे. त्याने नुकतीच त्याची टीम आणि त्याच्या घरी काम करत असलेल्या कामगारांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली आहे.

याबाबत नमित सांगतो, ‘शिक्षण हा आपल्या आयुष्यातील खूपच महत्त्वाचा पैलू आहे. काही मुलांना शिक्षण घेता येत नाही. बरेच दिवसांपासून शिक्षण क्षेत्रात काहीतरी करावे, अशी माझी इच्छा होती. यानिमित्ताने मी माझे पहिले पाऊल टाकले आहे.’  

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News