एमबीएचे शिक्षण घेऊन ते करतात चहाचा व्यवसाय, दिवसाला होतोय हजारोंचा धंदा

सुरज पाटील (यिनबझ)
Monday, 10 June 2019

एमबीए काय शिकवतं, मला खरचं माहित नाही, पण जर का विद्यार्थ्यांना स्वत:च्या पायावर उभा राहण्याची ताकद जर या एमबीएच्या शिक्षणामुळे माझ्या विद्यार्थी कम मित्राला मिळत असेल, तर खरच कळकळीची विनंती माझ्या सबंध मित्र परिवाराला की तुम्हीही एमबीएचे शिक्षण घ्या आणि तेही कोल्हापूरच्या छत्रपती शिवाजी महाराज युनिव्हर्सिटीमध्येच.

कोल्हापूर - शिक्षण माणसाचे विचार कसे आणि कधी बदलू शकेल हे कधीच समजत नाही, त्याचं जिवंत आणि ज्वलंत उदाहरण म्हणजे रेहान जमादर आणि त्याची टीम...रेहान आणि त्याचे इतर दोन साथीदार सध्या सायबर चौकात यशोदीप अमृततृल्य या ब्रॅंडचा चहाचा व्यवसाय करतात... त्याने केलेली इन्वेस्टनेंट आणि त्यासाठी घेतलेली मेहनत, केलेलं धाडस हे खरंच वाखणन्याजोगं आहे.

रेहानचं शिक्षण बारावी विज्ञान शाखेतून झालय, त्यानंतर काय करायचं काही कळत नसल्याने बीएससीच्या पदवी शिक्षणासाठी त्याने अर्ज केला. शिक्षण हा त्याच्या आवडीचा विषय नव्हताच, पण ल घरच्यांच्या जबरदस्तीने त्याने एमबीएच्या उच्च पद्यूत्तर शिक्षणासाठी अॅडमिशन घेतलं, तेही कोल्हापूर युनिव्हर्सिटीत. महाराष्ट्राची आनबानआणि शान अशा कोल्हापूरच्या छत्रपती शिवाजी महाराज युनिव्हर्सिटीत त्याने एमबीएचे शिक्षण पूर्ण केले. 

त्याला स्वत:चं असं अस्तित्व निर्माण करण्याचं बळ एमबीएने दिलं, असं तो सांगतो. म्हणजेच हा चहाचा व्यवसाय करण्याची ताकद आणि जिद्द ही एमबीएने मला दिली आणि त्यामुळेच माझ्या व्यवसायात आघाडीला जाईन असा त्याचा मानस आहे.

एमबीए काय शिकवतं, मला खरचं माहित नाही, पण जर का विद्यार्थ्यांना स्वत:च्या पायावर उभा राहण्याची ताकद जर या एमबीएच्या शिक्षणामुळे माझ्या विद्यार्थी कम मित्राला मिळत असेल, तर खरच कळकळीची विनंती माझ्या सबंध मित्र परिवाराला की तुम्हीही एमबीएचे शिक्षण घ्या आणि तेही कोल्हापूरच्या छत्रपती शिवाजी महाराज युनिव्हर्सिटीमध्येच.
- प्रा. मारुती पाटील

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News