शिक्षणाचे बाजारीकरण होत आहे का?

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 25 August 2020
  • आजची चर्चा, माझा अधिकार, माझे मत…
  • क्लसेसचे अनेक दुकाणे प्रत्येक शहरात निर्माण झाली आहेत. त्याला विद्यार्थी मोठ्या प्रमाणात बळी पडत आहे

मुंबई : दिवसेंदिवस शिक्षण व्यवसाय होत चालला आहेत. या व्यवसायाला सध्या बाजाराचे स्वरुप आले. अनेक खासजी क्लालेसवाले बाजारातील वस्तू प्रमाणे शुल्काता दर कमी जास्त करतात. विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी शिक्षण शुल्कात डिस्काऊंट देतात. क्लसेसचे अनेक दुकाणे प्रत्येक शहरात निर्माण झाली आहेत. त्याला विद्यार्थी मोठ्या प्रमाणात बळी पडत आहे, त्यामुळे खरचं शिक्षणाचे बाजारीकरण होत आहे का? या विषयावर यिनबझच्या विविध व्हॅट्सअॅप ग्रुपवर चर्चा करण्यात आली. त्यातील विद्यार्थ्यांनी दिलेल्या काही निवडक प्रतिक्रिया आम्ही देत आहोत.

होय, शिक्षणाचे बाजारीकरण होत चालले आहे. शिक्षणाच्या नावावर खासजी क्लासेसवाले भरमसाठ पैसा विद्यार्थ्यांकडून उकळत आहेत, आमचे कोचिंग क्लासेस सर्वोत्तम शिक्षण देण्यााचा प्रयत्न करत आहे अशी खोटी जाहीरात बाजी करुन शिक्षणाचा बाजार मांडला आहे.
-कृष्णा गाडेकर

डी. एड्, बी.एड् शिक्षण संस्था तर एकेकाळी व्यापाराच मोठ केंद्र बनल होत. चार भिंती उभारुन शिक्षण दिले जात होते आणि प्रत्येक विद्यार्थ्यांकडून लाखो रुपये उकळले जात होतो. आता अभियांत्रिकी शिक्षण संस्थानी डी. एड्, बी.एड्ची जागा घेतली आहे.
-रुपेश गायकवाड

सरकारने शिक्षणाचे खासगी करण करुन बाजारीकरणाला प्रोत्साहन दिले आहे. श्रीमंत व्यक्ती शिक्षण संस्था सुरु उघडतो आणि डोनोशनच्या नावाखाली लाखो रुपयाची कमई करत आहे, त्यामुळे शिक्षण हा एक व्यवसाय झाला आहे, त्याला बाजाराचे स्वरुप आले.
-गणेश वाघणारे
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News