मुलींसाठी धक्कादायक बातमी; सुंदर दिसण्यासाठी एडिट केलेला फोटो ओळखता येणार

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 18 June 2019

हे खास टूल बनविण्यासाठी कंपनीने आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर केला आहे. यामुळे एखाद्या एडिट केलेल्या फोटोमध्ये काय काय बदल केले आहेत याची माहिती मिळेल, याद्वारे एडिट करण्यात आलेला फोटो सहज ओळखता येणे शक्य होणार आहे. 

सध्या सोशल मीडियामध्ये कोणतेही फोटो पाहिजे तसे एडिट करुन सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केली जात आहेत. तरुण मुलामुलींमध्ये सेल्फी काढण्याची क्रेझ असून आपले फोटो एखाद्या अॅप मध्ये एडिट करून व्हाट्सअॅप डीपी किंवा स्टेट्स ठेवताना दिसतात. या तरूणांसाठी धक्कादायक बातमी असून आता फोटो एडिट करून सुंदर दिसण्याचेही दिवस संपणार आहेत, कारण आता एडिट केलेले फोटो ओळखण्यासाठी Adobe नवीन टूल घेऊन येत आहे.  

हे खास टूल बनविण्यासाठी कंपनीने आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर केला आहे. यामुळे एखाद्या एडिट केलेल्या फोटोमध्ये काय काय बदल केले आहेत याची माहिती मिळेल, याद्वारे एडिट करण्यात आलेला फोटो सहज ओळखता येणे शक्य होणार आहे. 

सॉफ्टवेअर क्षेत्रातील दिग्गज कंपनी Adobe ने फेक फोटोंना आळा घालण्यासाठी एक खास टूल तयार केले आहे. एडिट फोटो सहज ओळखता येणार आहे. फेक फोटो शोधणं सोपं होईल असा कंपनीचा अंदाज आहे.या नव्या टूलची चाचणीदेखील अॅडोबने घेतली आहे. 

युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया, बर्कलेतील संशोधकांच्या सहकार्याने कंपनीने हे नवे टूल तयार केले आहे. Face Aware Liquify या फीचरच्या मदतीने चेहऱ्यांमध्ये करण्यात आलेले बदल ओळखता येतात. तसेच खोट्या फोटोंमुळे होणारी दिशाभूल टाळता येईल असा दावा कंपनीने केला आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News