अर्थव्यवस्था, बेरोजगारीवर जनता गप्प का?

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 28 January 2020

प्रसिद्ध अभिनेत्री रिचा चड्ढा आपल्या वेगवेगळ्या भुमिकेमुळे चर्चेत असते. 'सध्या रिचाने सीएए आणि एनआरसीवर प्रतिक्रीया दिली. देशात अनेक मुलभूत समस्या आहेत त्याविषयी कोणी बोलत नाही ही खुप चिंताजनक बाब आहे' असे म्हणाली.

केंद्र सरकारच्या नागरिकत्व सुधारणा विधेयक आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी विरोधात देशभर आंदोलने होत आहे. आंदोलनाच्या समर्थनार्थ आणि विरोधात अनेक प्रतिक्रीया उमटत आहे. प्रसिद्ध अभिनेत्री रिचा चड्ढा आपल्या वेगवेगळ्या भुमिकेमुळे चर्चेत असते. 'सध्या रिचाने सीएए आणि एनआरसीवर प्रतिक्रीया दिली. देशात अनेक मुलभूत समस्या आहेत त्याविषयी कोणी बोलत नाही ही खुप चिंताजनक बाब आहे' असे म्हणाली.

रिचा म्हणाली की, 'आज देशाची प्राथमिकता बदलली आहे. अर्थव्यवस्था झपाट्याने घसरत आहे. बेरोजगारीने उच्चांक गाठला आहे. धोकादायक वेगाने प्रदूषण वाढत आहे. देशात अशा गंभीर समस्या असतांना सर्वांचे लक्ष सीएए आणि एनआरसी कायद्याकडे लागले आहे, जे अगदी अनावश्यक आहे.'

दिल्लीच्या शाहीन बागेत चालू असलेल्या आंदोलनावर रिचा यांनी आपले मत व्यक्त केले. "नागरिक शाहीन बागेत आंदोलन करत आहेत, त्यांच्या विषयी बोलल जात आहे की, 500 रुपये घेऊन लोक आंदोलनात सहभागी होत आहेत. या गोष्टी मला निर्थक वाटतात" असे रिचानी सांगितले.

देशाच्या अर्थव्यवस्थेची स्थिती पाहून आंदोलकांना विकत घेतले जावू शकते असे म्हणणे हास्यास्पद ठरेल! कोणाकडे इतके पैसे आहेत का? की लोकांना पैसे देऊन आंदोलन करायला लावू शकतात. शाहीन बागेत गेल्या दीड महिन्यांपासून निदर्शने चालू आहेत. या निदर्शनात महिला आणि मुलेही मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. या आंदोलनामुळे राजकारण तापले आहे.

अदनान सामी यांना पद्मश्री पुरस्कार दिला त्याबद्दल मत व्यक्त करताना रिचा चड्ढा म्हणाली की, "अदनानला पद्मश्री मिळाला त्याबद्दल मला काही हरकत नाही, उलट आनंद झाला. अदनान सामी सारखे पाकीस्तानचे अनेक गायक आहे. त्यांना भारतात गाण्यासाठी विरोध केला जात आहे, अशा वेळी अदनात सामी गप्प का आहेत? त्यांनी सरकारला प्रश्न विचारायला पाहिजे. असा
प्रश्न रिचाने उपस्थित केला.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News