भिजवलेले बदाम खाल्याने असे होतात फायदे

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 31 August 2019
  • बदामातील एन्झाइम्समुळे शरीरातील चरबी कमी होण्यास मदत होते. त्यामुळे पचनशक्ती सुधारते. 

तुमच्यापैकी अनेकजण रात्रभर पाण्यात भिजवलेले बदाम सकाळी उठल्यावर खात असतील. बदामामुळे बुद्धी तल्लख होते, असा सल्ला अनेकजण देतात. मात्र भिजवलेले बदाम खाण्याचे फायदे अनेक जणांना माहीत नसतात. ते जाणून घेऊयात. 

बदामामध्ये ई जीवनसत्त्व, कॅल्शिअम, झिंक आदी पोषक घटक असतात. त्यामुळे बदाम आरोग्यदायी आहेत. मात्र बदाम रात्रभर पाण्यात भिजवल्यानंतर त्यामधील हे सर्व शरीरात अधिक चांगल्या प्रकारे शोषून घेतले जातात. त्याचप्रमाणे, बदामाची साल काही जणांना पचनासाठी जड असते. ते रात्रभर भिजवल्यास साल काढणेही सोपे होते. 

बदामामुळे स्मरणशक्ती तल्लख होते. त्याचप्रमाणे, कच्चे, पाण्यात भिजवलेले बदाम खाल्ल्यामुळे पचनशक्तीही सुधारते. बदामातील एन्झाइम्समुळे शरीरातील चरबी कमी होण्यास मदत होते. त्यामुळे पचनशक्ती सुधारते. 

बदामात उष्मांक कमी प्रमाणात असतात. त्यामुळे वजन घटविण्यासाठीही ते फायदेशीर आहेत. वारंवार लागणाऱ्या भुकेवरही बदामामुळे नियंत्रण येते. त्यामुळे आहारात बदामांचा समावेश आवर्जून करावा. 

आजकाल फास्ट फूडमुळे वाईट कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढत आहे. भिजविलेले बदाम खाल्ल्यामुळे त्यावर नियंत्रण येते. त्यामुळे, हृदयावरील ताण कमी होतो. हदयविकारापासूनही बचाव होतो. 
 
रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठीही बदाम फायदेशीर आहे. नियमित बदाम खाल्ल्यास रक्तदाब नियंत्रणात राहतो. त्यामुळे रक्तदाबाच्या रुग्णांनी भिजविलेले बदाम खावेत.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News