पिझ्झा खाऊन त्याने घटवले चक्क ३६ किलो वजन..!

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 6 February 2020
  • आता फास्ट फूड म्हटलं की पिझ्झा आलाच..! मात्र पिझ्झा खाल्ल्याने तब्ब्ल ३६ किलो वजन कमी होऊ शकत.

आज वाढते वजन ही जागतिक समस्या बनली आहे. त्यासाठी जिम, डाईट, वर्कआउट हेल्थी फूड इतर काही उपचार करून वजन कसं कमी करता येईल याकडे लोकांचा कल असतो. मात्र तरीदेखील कुठेतरी वजन हे वाढलेलंच पाहायला मिळतं. या समस्येचे मूळ कारण म्हणजे बदलती जीवनशैली आणि फास्ट फूड.

आता फास्ट फूड म्हटलं की पिझ्झा आलाच..! मात्र पिझ्झा खाल्ल्याने तब्ब्ल ३६ किलो वजन कमी होऊ शकत. होय, हे खरं आहे. अमेरिकेतील एका शेफने पिझ्झा खाऊन तब्ब्ल ३६ किलो वजन घटवले आहे. त्यामुळे पिझ्झा खा आणि वजन कमी करा, असे सल्ले तो देताना दिसत आहे. 

न्यूयॉर्कमध्ये राहणाऱ्या एका शेफने रोज फक्त पिझ्झा खात आपले वजन घटवले आहे. वाढलेले वजन कमी करण्यासाठी त्याने कोणत्याही प्रकारचा वर्कआउट केला नाही, कोणते उपचार घेतले नाही. तरीही ३६ किलो वजन त्याने कमी केले आहे. त्याच्या माहितीनुसार, दुपारी लंचला मी केवळ पिझ्झा खाल्ला.

मात्र हा पिझ्झा मी स्वतः तयार करायचो. पिझ्झाला आवश्यक असणारा बेस बाजारातून विकत न घेता, घरीच पीठ, मीठ आणि पाणी यीस्ट वापरून बेस तयार केला. तसेच पिझ्झामध्ये वापरण्यात येणाऱ्या भाज्या देखील मी स्वतः निवडल्या. यामध्ये प्रामुख्यानं मश्रुम, मीट आणि इतर भाज्यांचा पुरेपूर वापर केला. तसेच चीज कमी प्रमाणात घेतले. या पिझ्झा शिवाय मी लंचमध्ये कोणतेही फूड न खाल्ल्याचे देखील त्याने सांगितले. 

दरम्यान पिझ्झा म्हटलं की कोल्ड्रिंक आलंच..! मात्र कोल्ड्रिंक न घेता मी फळांचा ज्यूस घायचो असं देखील त्याने सांगितलं. यावेळी फास्ट फूड न खाण्याचा खूप फायदा झाला. यासोबतच नियमित व्यायाम आणि योग देखील असल्याने हळूहळू वजन कमी होत असल्याचे पाहायला मिळाले. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News