'ही' पिवळ्या रंगाची फळे खा!;  हेल्दी आणि ग्लो स्किन मिळवा

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 11 August 2020

पिवळ्या रंगाची फळे त्वचेवर रामबाण उपाय असल्याचे त्वचारोगतज्ज्ञ सांगतात. पिवळ्या रंगाची फळे खाल्ल्यांनी त्वचेवर ग्लो येतो, त्वचा तजेलदार दिसतो.

त्वचेची काळजी घेण्यासाठी घरगुती उपायापासून बाजारातील केमिकल युक्त उत्पादणे वापरली जातात. तरीदेखील नैसर्गिक ग्लो येत नाही. त्यामुळे त्वचेचे काळजी घेण्यासाठी आहारात काही महत्त्वाचे बदल करावे लागतात. पावसाळ्यामध्ये त्वचा ही ड्राय होत असते, त्यासाठी काही हेल्दी फूट आहारात खाणे गरजेचे आहे. पिवळ्या रंगाची फळे त्वचेवर रामबाण उपाय असल्याचे त्वचारोगतज्ज्ञ सांगतात. पिवळ्या रंगाची फळे खाल्ल्यांनी त्वचेवर ग्लो येतो, त्वचा तजेलदार दिसतो. पिवळ्या फळांमधून ऑंटी एक्सीडेंट आणि विटामिन मोठ्या प्रमाणात मिळतात. चेहरा ग्लो करण्यासाठी हे फूड मदत करतात

पिवळ्या रंगाची फळे त्वचेवर गुणकारी उपाय 

1.केळी

केळीमध्ये पोषणतत्व असतात. पिवळ्या रंगाची केळी त्वाचा ग्लो ठेवण्यासाठी महत्वाची भूमिका बजावतात. केळी मध्ये विटामिन ए, विटामिन बी, विटामिन ई मोठ्या प्रमाणात आहेत. केळीमुळे शरीराची पचन क्षमता वाढते. मलनिस्सारण होण्यास मदत होते, त्यामुळे पिवळ्या रंगाची केळी खाणे आरोग्यासाठी लाभदायक आहे. 

2.कद्दू 

कद्दू मध्ये भरपूर विटामिन सी आणि इ असते, त्याचबरोबर लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम, झिंक, प्रोटीन आणि फायबर मिळतात. त्यामुळे कद्दूची भाजी खाणे आरोग्यासाठी चांगले आहे. गद्दू त्वचेवर ग्लो आणि हेल्दी ठेवण्यासाठी महात्वाची भुमिका बजावतो.

3.आंबे 

आंबा गुणकारी औषध आहे. आंब्यामध्ये फायबर आणि विटामिन भरपूर असतात, पीकलेल्या अंब्याची अतिशय स्वादिष्ट असते. आंब्याचा उपयोग त्वचा आणि चेस तंदरुस्त ठेवण्यासाठी केला जातो. केसाची कंडिशनिंग आणि चेहऱ्यावरील मुरुम काढण्यासाठी वापर केला जातो. हार्ट अट्याकच्या व्यक्तींसाठी अंब्याचा उपयोग केला जातो. पिवळा अंबा तत्वेचेवर ग्लो ठेवण्यासाठी मदत करतो.

4. लिंबू 

लिंबामध्ये विटामिन सी, विटामिन बी असते. लिंबू हा शरीराच्या अनेक रोगांवर गुणकारी उपाय म्हणून सिद्ध झाला. डेडस्किन आणि ब्लॅकहेड स्वच्छ करण्यासाठी लिंबाचा उपयोग केला जातो. लिंबू हे अॅटी बॅक्टीबायोटीक म्हणून वापले जाते. अनेकांना चेहऱ्याची एलर्जी असते, लिंबू अॅलजी पासून बचाव करतो. लिंबामुळे चेहला, त्वाचा ग्लो राहते.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News