बारीक होण्यासाठी खा अंडी .. 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 5 October 2019

डाएटबाबत सध्या परवलीचा शब्द म्हणजे हाय प्रोटीन डाएट. म्हणजे लो कार्ब्ज, लो कॅलरी आणि भरपूर प्रोटीन्स. त्याचा मंत्र आहे, ‘अंडी खा आणि बारीक व्हा.’

वाढलेले वजन हे आजच्या जगात सगळ्यांना पडणारा आणि सहजा सहजी न सुटणार प्रश्न आहे. त्यासाठी अनेकजण खूप काही युक्त्या लढवतात. जेवण कमी करतात. मिळेल त्या डाएट च्या मागे धावपळ करून स्वतःच्या शरीरावर परिणाम करून घेतात. परंतु योग्य डाएट पासून ते वंचित राहतात . आणि शरीराला आवश्यक असेलेले प्रोटीन त्यांना मिळत नाही. 
 
रोजच्या आहारातून कर्बोदकं कमी करून फक्त प्रोटीन खायचे म्हटल्यास शरीरावर त्याचा विपरित परिणाम होणारच. पिष्टमय पदार्थ हे आपल्या दैनंदिन जीवनात लागणाऱ्या ऊर्जेसाठी आवश्यक असतात. प्रोटीन डाएटमध्ये त्यांना पूर्ण फाटा दिल्याने या व्यक्तींना सतत थकल्यासारखं वाटतं. त्यामुळे संतुलित आहारावर भर असावा.

 वाढते वजन कमी करण्याच्या प्रश्नाचं उत्तर सर्वांना हवं असतं; पण त्यासाठी ‘शरीराला कष्ट करायला सांगू नका. कसलेही व्यायाम करू नका. केवळ खाण्यापिण्यावर निर्बंध घालून ते कमी कसं होईल तेवढं सांगा,’ असं सगळ्यांचं काकुळतीचं म्हणणं असतं. त्यामुळेच दर सहा-आठ महिन्यांनी एखाद्या फॅड डाएटची लाट येते आणि समस्त जाडजूड, स्थूल जनता त्यामध्ये वाहून जाते. डाएटबाबत सध्या परवलीचा शब्द म्हणजे हाय प्रोटीन डाएट. म्हणजे लो कार्ब्ज, लो कॅलरी आणि भरपूर प्रोटीन्स. त्याचा मंत्र आहे, ‘अंडी खा आणि बारीक व्हा.’

 यामध्ये पिष्टमय पदार्थ (कार्ब्ज) म्हणजे पोळी, ब्रेड, भात, केक, बिस्किटं, कुकीज, पास्ता, पूर्ण वर्ज्य असतात. मुख्य म्हणजे साखर आणि साखरयुक्त पदार्थांना, पेयांना संपूर्ण मज्जाव असतो. दिवसातून फक्त तीन वेळाच अन्नग्रहण करायचं. सकाळी नाश्ता, दुपारी आणि रात्री जेवण. कुठल्याही दोन खाण्याच्या अधेमधे पाणी वगळता काहीही घ्यायचं नाही. चहा, कॉफी, सरबत, लो कॅलरी पेये यांपैकी काहीही नाही. यात उकडलेली किंवा अर्धी शिजलेली अंडी, बिन तेलाचं ऑम्लेट, बिन मसाल्याचं चिकन, मासे खायला परवानगी आहे. त्याचबरोबर कोबी, ब्रोकोली, संत्री, मोसंबी, शतावरी, पालेभाज्या, मश्रूम्स, काकड्या आहारात घ्यायला मुभा असते.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News