पहाटेच्या थंडीचा रक्तदाब, मधुमेह रुग्णांनी जोखमीचा सामना करावा

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 11 January 2020

ऊबदार कपड्याचा वापर करावा स्निग्ध पदार्थ आहारात वाढवावे आले घातलेला चहा घ्यावा मोटारसायकलने जाताना डोके, कान गरम राहण्याची काळजी घ्यावी
अंघोळीसाठी कोमट पाण्याचा वापर करावा
दुचाकीवरून बाहेर पडताना वाऱ्यापासून बचाव करावा 
थंडी अधिक असल्यास घरातून दुपारी बाहेर पडावे

नागपूर : डिसेंबर महिना संपत आला की, थंडीची तीव्रता वाढते. पुढे संक्रांतीपर्यंत थंडीचा कडाका जाणवतो. हवेतील बदलाचा परिणाम आरोग्यावर होतो. अलीकडे पाऊस आणि थंडी असा दुहेरी आघात होत असल्याने कडाक्‍याची थंडी जाणवत आहे. 

रात्रीचे किमान तापमान ५.६ अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरते. थंडीच्या दिवसांत पहाटेच्या वेळी हृदयविकार तसेच पक्षघाताचा झटका येण्याची मोठी जोखीम आहे, असे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील सहयोगी प्राध्यापक डॉ. विनोद खंडाईत, सहयोगी प्राध्यापक डॉ. प्रवीण शिंगाडे यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

थंडीचे दिवस साऱ्यांनाच आवडतात. परंतु, या दिवसातील आरोग्याचे धोके समजून घेणे आवश्‍यक असल्याचे डॉक्‍टरांनी नमूद केले. डॉ. खंडाईत म्हणाले, दिवसाचे कमाल तापमान ८ ते १० अंशांपर्यंत वर सरकत आहे. मात्र, रात्रीपासून पहाटेपर्यंत थंडीचा जोर असतो. सकाळी गारठा, दुपारी ऊन यामुळे थंडी, ताप, खोकला, दमा रुग्णसंख्येत वाढ झाल्याचे दिसते. मात्र, हिवाळ्यात पहाटेच्या वेळी रक्तदाब, मधुमेह असणाऱ्या रुग्णांना जोखमीचा सामना करावा लागतो. रक्तदाब वाढला की,नाडीचा वेग वाढण्याची भीती आहे.

हिवाळ्यात रक्तातील प्लेटलेट्‌स नसांना चिटकून असतात, यामुळे हृदयविकाराचा धोका असतो. यावरील उपाय सांगताना डॉ. खंडाईत यांनी धूम्रपान, तंबाखूसारख्या व्यसनांपासून दूर राहण्यासोबतच व्यायाम करण्याचा सल्ला दिला.  
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News