स्थानिकांच्या नोक-यांसाठी राज्यात लवकरचं कायदा

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 20 August 2020

स्थानिकांच्या नोक-यांसाठी राज्यात लवकरचं कायदा

स्थानिकांच्या नोक-यांसाठी राज्यात लवकरचं कायदा

महाराष्ट्र - नुकतेच मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी स्थानिकांना नोकरीमध्ये प्राधान्य देण्याचे जाहीर केले आहे. महाराष्ट्रात अर्थसंकल्प सादर करताना स्थानिकांना नोकरीमध्ये धोरण जाहीर केले होते. आगामी अधिवेशनात तसा कायदा करण्याची तयारी सत्ताधा-यांनी केली आहे.

खासगी नोक-यांमध्ये स्थानिक तरूणांना ७५ टक्के नोकरी देण्याचा कायदा मागच्यावर्षी आंध्रप्रदेशात करण्यात आला होता. आंध्रप्रदेशातील तरूणांना नोकरीसाठी इतर राज्यात जावे लागत असल्याने मुख्यमंत्री जगमोहन रेड्डी यांनी सत्तेत येताच कायदा केला. स्थानिकांच्या नोक-यांसाठी कायदा करणारे आंध्र प्रदेश एकमेव राज्य ठरले आहे.

शासनाच्या धोरणामध्ये स्थानिक तरूणांच्या नोकरीला प्राधान्य देण्यात आले आहे. या धोरणातील त्रुटी दूर करून त्या धोरणाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याकरिता सर्वसमावेशक कायदा करण्याचा शासनाचा मानस आहे,’असे उपमुख्यमंत्री व वित्तमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर करताना जाहीर करताना सांगितले होते.

महाराष्ट्र राज्यात आरक्षण लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाविकासआघाडी सरकारने तशी अर्थसंकल्पात तरतूद सुध्दा केली होती. पण कोरोनाच्या संसर्गामुळे अधिवेशन आटोपत घ्यावं लागलं. होणा-या अधिवेशन काळात आरक्षण लागू करण्यासाठी कायदा करण्यात येईल. – सुभाष देसाई, उद्योगमंत्री

राज्यातल्या तरूणांसाठी नोकरीमध्ये ८० टक्के आरक्षण ठेवण्याची सरकारचा मानस आहे. – अजित पवार, उपमुख्यमंत्री

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News