तुम्हीही कानात तेल घालता का? तर हे वाचाच..!

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 27 January 2020
  • गेल्या अनेक वर्षांपासून आपल्याकडे कानाच्या समस्या दूर करण्यासाठी तेलाचा वापर केला जातो.
  • अगदी जन्मलेल्या लहान बाळाची मालिश करताना देखील त्याचा कानात तेल टाकले जाते.

कानाच्या अनेक समस्या दूर व्हाव्यात यासाठी अनेकजण कानात तेल घालतात. मात्र कानात तेल घातल्याचे परिणाम देखील तेवढेच असल्याचे डॉक्टर सांगतात. गेल्या अनेक वर्षांपासून आपल्याकडे कानाच्या समस्या दूर करण्यासाठी तेलाचा वापर केला जातो. अगदी जन्मलेल्या लहान बाळाची मालिश करताना देखील त्याचा कानात तेल टाकले जाते. मात्र हे तेल टाकणे योग्य नसल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे. 

कान कोरडा पडला किंवा कानात खाज येऊ लागल्यास अनेकजण कानात तेल टाकण्याचा सल्ला देतात. कानात तेल टाकल्यावर कानात मळ जमा होत नाही, कानातील त्वचा ओली राहते, असं सांगण्यात येते. थंडीच्या दिवसांत कान कोरडा होण्याचे प्रमाण अधिक असते. त्यावेळी कां ओला राहण्यासाठी तेल थोडं कोमट करून कानात टाकल्यास कोरडेपणा दूर होतो, असं देखील सांगण्यात येतं. मात्र कानात तेल टाकल्याने त्रास होऊ शकतो असं डॉक्टरांनी म्हटले आहे.  

ईएनटी(कान, नाक, घसा) डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, कोणत्याही वयोगटातील व्यक्तींनी कानात तेल घालणे चुकीचे आहे. लहान बाळासाठी तर ते धोकादायक ठरू शकते. कानात होणारा कोरडेपणा किंवा खाज कोणत्या गोष्टीमुळे येते, याचे कारण आपल्याला लक्षात येत नाही. त्यावर कानात तेल टाकल्यास इन्फेक्शन होण्याची किंवा फंगस (बुरशी) होण्याची दाट शक्यता असते. 

एखाद्या व्यक्तीला कानात खाज किंवा कोरडेपणा सातत्याने जाणवत असेल तर त्याने डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य ठरते. कानात तेल टाकणे किंवा बर्डच्या सहाय्याने कान कोरल्याने कानाला इजा पोहचू शकते. तसेच कान खाजवताना कोणतीही टोकदार वस्तू कानात घातल्याने कानाच्या आतील त्वचेला इजा होण्याची शक्यता असते.

योग्यरीत्या उपचार न केल्यास मोठ्या समस्या उदभवू शकतात. यासोबतच कानात सतत खाजविल्याने त्यामुळे जखम होते, त्या जखमेतून हिस्टॅमिन बाहेर पडते. यामुळे कानात आणखी खाज येते. कानातील समस्येसाठी इअर ड्रॉप्स मिळतात. मात्र याबाबत कोणतीही औषधे घेताना डॉक्टरांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरते. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News