अंध तरुणीने घेतली गरुड झेप; यूपीएससी परीक्षेत मिळविला २६६ वा क्रमांक

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 12 August 2020
  • डोळ्यांमध्ये प्रकाश नसला तरीही दृष्टी योग्य असेल तर स्वप्ने नक्कीच वास्तवात बदलतात. तमिळनाडूच्या अंध पूर्णंदा सुंदरीची कहाणी आपल्याला शिकवते की आपले उत्कटता, समर्पण आणि कठोर परिश्रम तुम्हाला यशाच्या शिखरावर कसे आणू शकतात.

डोळ्यांमध्ये प्रकाश नसला तरीही दृष्टी योग्य असेल तर स्वप्ने नक्कीच वास्तवात बदलतात. तमिळनाडूच्या अंध पूर्णंदा सुंदरीची कहाणी आपल्याला शिकवते की आपले उत्कटता, समर्पण आणि कठोर परिश्रम तुम्हाला यशाच्या शिखरावर कसे आणू शकतात. यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षा २०१९ मध्ये मदुरैच्या पूर्णाने २६६ वा क्रमांक मिळविला आहे. हा तिचा  चौथा प्रयत्न होता.  तिने आपल्या यशाचे श्रेय आपल्या  पालकांना दिले.

वृत्तसंस्थेतील एएनआयशी झालेल्या संभाषणादरम्यान ती म्हणाली की, 'माझ्या पालकांनी मला खूप पाठिंबा दिला. या यशाचे श्रेय मी त्यांना देऊ इच्छिते. हा माझा चौथा प्रयत्न होता. या परीक्षेच्या तयारीसाठी मला 5 वर्षे लागली. '

परीक्षेच्या तयारीत असताना 25 वर्षीय पूर्णंदा सुंदरीला अनेक समस्यांचा सामना करावा लागला. पण तिने हार मानली नाही. तेती म्हणाली, 'तयारीच्या वेळी मी ऑडिओ फॉरमॅटमध्ये उपलब्ध असलेल्या अभ्यास साहित्याची मदत घेतली. याशिवाय लॅपटॉपमध्ये स्पिकिंग सॉफ्टवेयरची मदतही घेण्यात आली. माझ्या पालकांनी मला ती पुस्तके वाचून सांगितली. या व्यतिरिक्त माझ्या मित्रांनी आणि ज्येष्ठांनी मला खूप पाठिंबा दिला.

असे नाही की पौर्णिना जन्मापासूनच आंधळी होती. ५ वर्षापर्यंत सामान्य  सामान्य मुलांप्रमाणे शिकली. पण तिची दृष्टी क्षीण होत गेली. काही काळानंतर तिच्या दोन्ही डोळ्यांचा प्रकाश गेला. पण अंधाराच्या आयुष्यात तिची स्वप्ने कायम राहिली आणि ती पूर्ण करण्यासाठीतिने परिश्रमपूर्वक काम केले.

पूर्णा  म्हणाली की तिला आरोग्य, शिक्षण आणि महिला सबळीकरणावर  काम करायचे आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News