मॅचदरम्यान नवऱ्याला इतर मुलीसोबत किस करताना टिव्हीवर live पाहिलं आणि...

यिनबझ टीम
Saturday, 25 January 2020

सध्या एक व्हिडीओ परदेशाच्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे.  इक्वाडोरमध्ये  एक विवाहित पुरुष आपल्या प्रेयसीबरोबर स्टेडियममध्ये बसून सामना पाहत होता. दरम्यान त्याने तिच्या प्रेयसीला किस केला आणि त्याचदरम्यान तो व्हिडीओ live सगळीकडे दाखवण्यात आला.

इक्वाडोर देशामध्ये सुरू असलेल्या बर्सिलोना आणि डेलफिन यांच्यातला सामना देवेई एंड्रेड आणि तिची प्रेयसी पाहात होती. सामन्यादरम्यान हे दोघे एकमेकांना किस करत होते, मात्र अचानक टिव्ही स्क्रिनवर हे दाखवण्यात आलं आणि थेट ते इतर टिव्हीवरही प्रक्षेपण करण्यात आलं, त्यामुळे घरात बसून सामना पाहाणाऱ्या देवेईच्या पत्नीलासुध्दा हा सिन पाहाता आला. ज्यावेळी देवेईला समजलं की त्यांच्यात सुरू असलेला किसिंग सिन सामन्यातल्या मोठ्या स्क्रिनवर तसेच इतर टिव्हीवर दाखवला जात आहे, तोपर्यंत वेळ झाली होती.

सामन्यातला सिन पाहिल्यानंतर देवेईच्या पत्नीने घर सोडून जाण्याचा निर्णय घेतला तर देवेईने इन्स्टाग्रामवर तिची माफी मागितली आहे. त्याला ट्रोल करणाऱ्या इतर सोशल मीडिया वापरकर्त्यांना देखील त्याने हा विषय आता थांबवण्याची विनंती केली आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News