वाढत्या तपमानामुळे दारूच्या तुलनेत चिल्ड बिअरकडे तळीरामांचा ओढा !

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 3 June 2019
  • उन दिसेंदिवस वाढत आहे
  • देशीवर मात्र परिणाम नाही !
  • दारूची नशा करणार्‍यांना देखील वाढत्या उन्हाच्या पार्‍याचा चांगलाच बसत आहे फटका

माहूर : दारूचा नशा भल्याभल्यांना आयुष्याला दुर्दशा येण्यासाठी कारणीभूत ठरतो. या नशेची झिंग अनुभवण्यासाठी अनेक नवशिक्यांना एक प्रकारची लालसा पहायला मिळते. उन दिसेंदिवस वाढत आहे. उन्हाळा आणि तापमानाचा उच्चांक हे गत काही वर्षापासून एक समीकरण बनलेले आहे. त्यामुळे दारूची नशा करणार्‍यांना देखील वाढत्या उन्हाच्या पार्‍याचा चांगलाच फटका बसत आहे.

उच्च तापमानात दारूचा घोट हार्डड्रिंक ठरत असल्याने अनेकांनी तात्पुरता दारूला फाटा देऊन चिल्ड बिअरला पसंती देऊन चव बदलल्या आहे. गत चार महिन्यात दारूपेक्षा बिअरला जास्त मागणी असल्याचे बिअर बार चालकांकडून सांगण्यात येत आहे.

“शाम का वक्त हो, और शराब ना हो. “वक्त इतना भी खराब ना हो' शायरीतल्या या ओळी तळीरामांच्या जीवाची घालमेल सांगुन जातात. सध्यातर लग्नसराईचा सिझन सुरु आहे. नाही म्हणायला नुकताच निवडणूकीचा बारही उडाला. राजकारणी लोकांच्या सानिध्यात येऊन काही नवशिके तळीराम सुद्धा तयार झाले असून त्यामुळे 'पिणार्‍यां'चा सुळसुळाट दिसून येतोय.

वाढत्या तापमानात हॉट असलेल्या दारु ऐवजी सॉफ्ट ड्रिंक म्हणून 'चिल्ड बिअर'ला अधिक पसंती मिळत आहे. मे च्या उन्हाच्या तडाख्यात हे प्रमाण अधिक वाढले होते. माहूर सारख्या तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिध्द असलेल्या ठिकाणी तळीरामांची बिअरला पसंती पाहता हॉट शहरांमध्ये चित्र याहून वेगळे निश्‍चित ना ही! उन्हाचा हा परिणाम वेगळय़ा अर्थाने देखील चर्चेचा ठरत आहे.

सध्याही उन्हाचा पारा चढता असल्याने बार, धाबे, सायंकाळी गच्च भरलेले दिसून येत आहे. तर सुरुवातीस फुकटात पाजणारे मिळाल्याने विदेशी पासून सुरु करून नंतर नशेची क्षमता वाढल्यानंतर नाइलाजाने देशी दारूकडे वळलेले काही तळीराम मात्र जीवाची पर्वा न करता देशीच ढोसत असल्याचे दिसत असून त्यांच्या आरोग्याकडे उत्पादन शुल्क विभागाचे कोणतेही लक्ष नसल्याचे दिसत आहे.

दारू विक्रेत्यांना कोणतेही अंकुश लावले जात नसल्याचे बोलल्या जात असून मनात येईल तेव्हा देशी दारू दुकानाला भेट देऊन तपासणी करायची व काही तृटीवर बोट ठेऊन माया दाखवली की सर्व काही आलबेल असल्याचा अभिप्राय द्यायचा असा गोरखधंदा सुरु असल्याची जोरदार चर्चा होत असून विदेशी दारूचे बार, बिअर शॉपी बाबतही हाच फंडा अवलंबण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे.

काही बिअर शॉपीत त्यांना केवळ विक्री करण्याचीच परवानगी असतांना सुद्धा राजरोस पणे तळीरामांना बसून आरामात पेयपान करण्याची व्यवस्था केल्याचे दिसत असून ग्रामीण भागात बिअर शॉपीच्या नावाखाली देशी, हातभट्टी ची सुद्धा राजरोस विक्री होत असल्याची चर्चा आहे. उत्पादन शुल्क विभाग व पोलीस मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरीकाकडून होत आहे.  

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News