...या कारणामुळे दहावी आणि बारावीच्या फेरपरीक्षा लांबणीवर

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 16 September 2020
  • कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भाव राज्यातील दहावी आणि बारावीच्या परीक्षेतील अनुत्तीर्ण विद्यार्थांची फेरपरीक्षा राज्यातील कोरोनाची परिस्थिती कशी आहे त्यावरून परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला गेला आहे.

पुणे :- कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भाव राज्यातील दहावी आणि बारावीच्या परीक्षेतील अनुत्तीर्ण विद्यार्थांची फेरपरीक्षा राज्यातील कोरोनाची परिस्थिती कशी आहे त्यावरून परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला गेला आहे. अलिकडे कोरोनाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे, विद्यार्थांच्या जीवाला धोका नको म्हणून परिस्थिती पाहून परीक्षा घेतली जाणार आहे. म्हणूनच या वर्षी फेरपरीक्षा लांबणीवर गेल्या आहेत. नोव्हेंबर किंवा डिसेंबरच्या दरम्यान या फेरपरीक्षा होऊ शकतात. पण, विद्यार्थांच्या अकरावी प्रवेशाचे काय, हा प्रश्न मात्र अनुत्तरीत आहे. राज्य मंडळाकडून दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर केल्यानंतर महिन्याभरात फेरपरीक्षा घेतली जाते. त्यात उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशासाठी संधी मिळते. परंतु, करोना संसर्गामुळे यंदा फेरपरीक्षा घेण्यात आलेली नाही. तसेच फेरपरीक्षा कधी होणार याबाबत अद्याप निर्णयही झालेला नाही.

राज्य मंडळाच्या अध्यक्षा शकुंतला काळे म्हणाल्या, ‘शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितल्यानुसार, संसर्गाची परिस्थिती पाहून फेरपरीक्षा घेण्यात येईल. नोव्हेंबर-डिसेंबरच्या दरम्यान परीक्षा होऊ शकतात. सद्यस्थितीत परीक्षा घेण्यात अनेक अडचणी आहेत. प्रशासनाने अनेक शाळा विलगीकरण कक्षासाठी घेतल्या आहेत. परस्पर अंतर राखून परीक्षा घेण्यासाठी परीक्षा कक्ष वाढवावे लागतील, त्यासाठी मनुष्यबळही वाढवावे लागेल. परंतु त्यासाठी, पहिले शाळा उपलब्ध व्हाव्या लागतील. त्यामुळे परिस्थितीचा आढावा घेऊन परीक्षा घेण्यात येईल.’

तसेच, फेरपरीक्षा नोव्हेंबर- डिसेंबरमध्ये घेतली जाणार असल्यास एटीकेटी मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या अकरावी प्रवेशाचे काय, हे विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार का असा प्रश्न आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News