प्रकृती खालावल्याने मराठा आंदोलकांना हलवले रूग्णालयात 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 1 March 2020

सरकारकडून सकारात्मक पाऊल उचलले जात नसल्याने ३६ जिल्ह्यातील मराठा तरूण आज आझाद मैदानात आंदोलनात सहभागी होणार आहेत. 

मुंबई - मागील ३३ दिवसांपासून सुरू असलेल्या मराठा आंदोलकांनी अखेर तीव्र पवित्रा घेऊन आंदोलनालाला सुरूवात केली आहे, विशेष म्हणजे ३३ दिवस होऊनही सरकार दखल घेत नसल्याने संतापलेल्या आंदोलकांनी शनिवारपासून अन्नत्याग करून आंदोलनाला सुरूवात केली आहे. शुक्रवारी तरूण आंदोलक उज्ज्वल धावडे यांच्या प्रकृती खालावल्याने त्याला जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले. 

कलम १९ नुसार मराठी त्या-त्या पदावर नियुक्ती व्हावी या मागणीसाठी मागील ३३ दिवसांपासून आंदोलक आझाद मैदानात आंदोलन सुरू आहे. सरकारची उदासिनता पाहून आंदोलकांनी शनिवारपासून अन्नत्याग करून तीव्र पवित्रा घेतला. 

अतिष पाटील या तरूणाला प्रकृती खालावल्याने शनिवारी दुपारी जवळच्या रूग्णालयात दाखल केले. त्यानंतर ओम धायगुडे याला सुध्दा लगेच रूग्णालयात दाखल केले. तर, अर्चना पानपट्टे यांचा बीपी वाढल्याने त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. संभाजी वडजे, प्रमोद वाकडे आणि प्रियांका जाधव यांच्यावरती प्राथमिक स्वरूपाचे उपचार करून घरी पाठवण्यात आले. 

सरकारकडून सकारात्मक पाऊल उचलले जात नसल्याने ३६ जिल्ह्यातील मराठा तरूण आज आझाद मैदानात आंदोलनात सहभागी होणार आहेत. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News