या कारणामुळे पुणे विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ पुढे ढकलला

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 2 September 2020

या कारणामुळे पुणे विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ पुढे ढकलला

या कारणामुळे पुणे विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ पुढे ढकलला

पुणे - माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या निधनामुळे राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे गुरूवारी होणारा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा दीक्षांत पुढे ढकलण्यात आला आहे. पुढील दीक्षांत समारंभाची तारीख लवकरच कळवण्यात येईल असं विद्यापीठ प्रशासनानं जाहीर केलं आहे.

हा समारंभ गुरूवारी विद्यापीठाच्या संकेतस्थळावरती ऑनलाईन होणार होता. तसेच समारंभाला राज्यपाल  भगतसिंह कोश्यारी, फोर्ब्स मार्शल प्रा. लि. चे सह अध्यक्ष डॉ. नौशाद डी. फोर्ब्स हे प्रमुखपाहूने म्हणून ऑनलाईन पद्धतीने उपस्थित असणार होते.

विद्यापीठाच्या ११७ व्या पदवीप्रदान समारंभ ऑनलाईन समारंभात २०१८-१९ मध्ये उत्तीर्ण झालेल्या विविध शाखांमधील ७ हजार ३५ विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्रे देण्यात येणार होती. त्यामध्ये १०४ पीएच. डी झालेल्या पदवी प्रमाणपत्रासाठी अर्ज केले होते. त्यापैकी ७ विद्यार्थ्यांना समारंभात पदवी प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार होते. कोरोनाच्या काळात भव्य दिव्य असा कार्यक्रम आयोजित नाही होऊ शकत, त्यामुळे विद्यापीठाने ऑनलाईन पदवीप्रदान समारंभाचे आयोजन केले होते. विशेष म्हणजे विद्यार्थींनी अर्जात नमूद केलेल्या पत्त्यावर त्यांचं प्रमाणपत्र पाठवण्यात येणार आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News