नशेत तरूणाने इतके किलोमीटर विना टायर गाडी चालवली, आणि मग...

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 17 July 2020

नशेत तरूणाने इतके किलोमीटर विना टायर गाडी चालवली, आणि मग...

नशेत तरूणाने इतके किलोमीटर विना टायर गाडी चालवली, आणि मग...

महाराष्ट्र  - आता प्रत्येकजण आपली चारचाकी गाडी चालवाताना दिसतो. पण गाडी चालवण फक्त गरजेचं नसून गाडी खराब झाली तर गाडीची बेसिक माहिती आपल्याला असणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे ऑस्ट्रेलियात एक तरूणाने नशेत पंक्चर झालेली गाडी कित्येक किलोमीटर तशीच चालवल्याचे उघडकीस आले आहे. 

दारू पिल्यानंतर पंक्चर झालेली आपली गाडी पंक्चर काढता येत नसल्याने कित्येक किलोमीटर तशीच चालवली. ही घटना ऑस्ट्रेलिया मेलबर्नमध्ये घडली आहे. त्यानंतर पोलिसांनी तरूणाला ताब्यात घेतले आणि त्याच्याकडून दंड वसूल केला. 

मेलबर्न मधील विक्टोरिया पोलिसांनी एक थांबलेली गाडी पाहिली. त्यानंतर पोलिसांनी गाडी पाहणी केल्यानंतर गाडी पंक्चर असल्याचे समजले. चालक तरूणांची चौकशी केली असता, तो तरूण दारूच्या नशेत असल्याचे समजले. त्याचबरोबर त्याने गाडी कित्येक किलोमीटर विनाटायर चालवल्याचे सुध्दा सांगितले. पोलिसांनी गाडी चालकाचे एक वर्षासाठी लायसन्स रद्द केले त्याचबरोबर पोलिसांनी त्याला १ लाख २४ हजारांचा दंड केला. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News