सर्दी खोकल्याची औषधे परस्पर विकण्यास औषध दुकानदारांना मनाई 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 20 July 2020

मुंबईत पावसाने ओढ दिल्यामुळे तापमानात वाढ झाली असून पुढील गुरुवारपर्यंत अशीच परिस्थिती राहाणार असल्याचा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे.

मुंबई : मुंबईत पावसाने ओढ दिल्यामुळे तापमानात वाढ झाली असून पुढील गुरुवारपर्यंत अशीच परिस्थिती राहाणार असल्याचा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे. त्यामुळे सर्दी, खोकला, तसेच तापाचे आजार पसरण्याची शक्‍यता आहे. या पार्श्‍वभूमीर कोविडसदृष्य लक्षणे असल्यास घरीच औषधे न घेता डॉक्‍टरांचा सल्ला घेण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे.

कुलाबा येथे आज संध्याकाळपर्यंत कमाल 32 आणि किमान 23.4 अंश सेल्सिअस आणि सांताक्रूझ येथे कमाल 32.6 आणि किमान 25.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. पुढील 48 तास तापमान याच पातळीवर राहाणार आहे. गुरुवारपर्यंत मुंबईसह संपूर्ण कोकणात हलक्‍या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्‍यता आहे.
जोरदार पावसानंतर ऊन सुरू झाल्यास मुंबईत सर्दी, खोकला तापासारख्या आजाराचे रुग्ण वाढू लागतात. कोव्हिड बाधा झाल्यावरही सर्दी, खोकला ताप अशी लक्षणे दिसतात. राज्य सरकारने ताप, सर्दी खोकल्याची औषधे परस्पर विकण्यास औषध दुकानदारांना मनाई केली आहे. मुंबईतील 400 हून अधिक ठिकाणी फिव्हर क्‍लिनिक सुरू करण्यात आले आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News