दुष्काळ

डॉ. संदीप क्षीरसागर, सातारा
Wednesday, 29 May 2019

गुरापोरांची नुसतीच ओरड.. 
कशी भागवू मी 
घशाची कोरड... 

  थेंबांच गणित... 
    कुणाला कळलऽ का रे? 
घोटभर पाण्यासाठी... 
    कुणी नमलऽ का रे? 

नुसताच ओसाड मळा.. 
 सुखलेला खळा 
  अंगाला नुसत्याच.... 
गरम झळा 

गुरापोरांची नुसतीच ओरड.. 
कशी भागवू मी 
घशाची कोरड... 

धगधगत्या उन्हानं 
    रान कसऽ पेटलय... 
आता डोळ्यातल
पाणी सुद्धा आटलय... 

आता "देवा "
तुझीच मला आस...कसा... 
लाऊनी घेऊ नको मी फास? 

अरे... 
कसा... 
लाऊनी घेऊ नको मी फास? 

थेंबांच गणित... 
    कुणाला कळल का रे? 
घोटभर पाण्यासाठी... 
कुणी नमल का रे? घोटभर पाण्यासाठी? 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News